सोनी मराठीवर नवीन मालिका क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची


पुणे -आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून  रात्री १० वा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्व आणि त्यापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  

या कार्यक्रमाची निर्मिती राकेश सारंग यांनी केली आहे. राकेश सारंग हे कलाविश्वात प्रसिद्ध नाव असून क्राईम शोज हा त्याचा हातखंडा आहे. मराठीतील त्यांची ही निर्मिती नक्कीच मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक ठरेल. अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

अधिक वाचा  ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च : १५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित

अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून त्याने काही काळ रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे. त्याची उत्तम संवाद  आणि भाषेवर पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं ही एक मोठी जबादारी आहे असं देखील अभिजितचं म्हणणं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा या याबद्दल बरीच माहिती मिळणार आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love