मुंबई -रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी “नवीन जिओफोन 2021 ऑफर” सादर केली आहे. या मध्ये जियोफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 1999 रुपये द्यावे लागतील, तसेच 2 वर्षापर्यंत अमर्यादित कॉलिंगसह दरमहा 2 जीबी डेटा मिळेल. दुसरी योजना 1499 रुपयांची आहे ज्यामध्ये जिओफोनसह एका वर्षासाठी असीमित कॉलिंगसह ग्राहकांना दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.
दरम्यान ,749 रुपयांची मुबलक रक्कम भरल्यास त्यांना एका वर्षासाठी रिचार्जच्या त्रासातून मुक्ती मिळेल. अमर्यादित कॉलिंग आणि दरमहा 2 जीबी डेटा देखील उपलब्ध असेल. ही ऑफर १ मार्चपासून संपूर्ण भारतात लागू होईल. ऑफरचा लाभ सर्व रिलायन्स रिटेल आणि जिओ किरकोळ विक्रेत्यांकडून घेता येईल.
30 कोटी 2 जी ग्राहकांची परिस्थिती दयनीय आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांनी बर्याचदा कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागत नसले तरी व्हॉईस कॉलिंगसाठी 2G वापरनाऱ्या फीचर फोन ग्राहकांना प्रति मिनिट 1.2 ते 1.5 रुपये मोजावे लागतात. त्याच वेळी, कनेक्शन चालू ठेवण्यासाठी आपल्याला दरमहा 50 रुपये द्यावे लागतात. टू-जी फ्री इंडियासाठी ही ऑफर मोठे पाऊल असल्याचे जिओने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत जिओफोन असणार्या लोकांची संख्या 100 दशलक्षांवर पोहोचली आहे. फीचर फोन वापरणार्या अशा 30 कोटी 2 जी ग्राहकांवर जिओची नजर आहे.
यावेळी बोलताना रिलायन्स जिओचे संचालक श्री. आकाश अंबानी म्हणाले, “जेव्हा जग 5 जी क्रांतीच्या मार्गावर आहे. तेव्हा भारतातील 300 दशलक्ष लोक 2 जी मध्ये अडकले आहेत. त्यांना मूलभूत इंटरनेट सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. गेली 4 वर्षे, जिओने सर्वाना इंटरनेट उपलब्ध करुन दिले आहे आणि प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाचा फायदा झाला आहे. तंत्रज्ञानाला यापुढे काही निवडक लोकांचा विशेषाधिकार राहिलेला नाही. नवीन जिओफोन 2021 ही ऑफर त्या दिशेने अजून एक पाऊल आहे. जिओमध्ये आम्ही हे डिजिटल विभाजन मिटवणार आहोत”.
स्वस्त किंमती आणि बॅटरीमुळे जिओफोनला अधिक लोकप्रियता मिळाली. हा फीचर फोन सध्या भारतातील बरीच लोकसंख्या वापरत आहे. आतापर्यंत कंपनीने या मालिकेत दोन फोन बाजारात आणले आहेत. या मालिकेतील पहिला फोन जिओफोन होता. त्यानंतर कंपनीने जिओफोन 2 बाजारात आणला. हे फिचर फोन विक्री चार्ट मध्ये अव्वल आहे आणि सध्या फिचर फोन बाजारात आघाडीवर आहे. रिलायन्स जिओने ‘स्मार्टफोन ऑफ इंडिया’ म्हणून जियोफोनला ब्रँड केले आहे.