#Pune Real Estate: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात ‘व्हीटीपी रिअल्टी’ची अद्वितीय कामगिरी :आर्थिक वर्ष 23-24 च्या अखेरीस  5 दशलक्ष चौरस फूट वितरणाचा टप्पा गाठणार

VTP Realty's unique performance in real estate sector in Pune
VTP Realty's unique performance in real estate sector in Pune

VTP Realty : Pune Real Estate : पुण्यातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी(Real Estate Co.) असलेल्या व्हीटीपी रिअल्टी (VTP Realty)  आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एक लक्षणीय टप्पा गाठत 5 दशलक्ष चौरस फूट (5000 हून अधिक युनिटस) वितरीत करण्यासाठी सज्ज झाली आहे.  भारतभरात काही निवडक ब्रँडसना आजवर हा टप्पा गाठता आला. हा महत्त्वाचा टप्पा व्हीटीपीच्या(VTP) संघटनात्मक सामर्थ्याचा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात (Real Estate sector) बजावत असलेल्या भूमिकेला प्रवर्तित करतो. उत्कृष्टततेसाठी कंपनीची बांधिलकी आणि धोरणात्मक उपक्रम यामुळे व्हीटीपी हा ब्रँड उद्योगात अग्रेसर आहे, असे व्हीटीपी रिअल्टीचे (VTP Realty) कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी(Executive Director and Chief Executive Officer)  सचिन भंडारी(Sachin Bhandari) यांनी सांगितले. (VTP Realty’s unique performance in real estate sector in Pune)

गेल्या वर्षभरात व्हीटीपी रिअल्टीने वितरणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे.ब्रँडने सलग 6 वर्षे विक्रीत उत्कृष्ट कामगिरी केली असून उच्च मापदंड प्रस्थापित करत आहे.विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाअखेरीस व्हीटीपी आजवरच्या आपल्या प्रवासामध्ये 10 दशलक्ष चौरस फूट वितरणाचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा  छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला -मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर

विक्रीच्या बाबतीत व्हीटीपीचे गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत (4000 कोटी रूपये) 15 टक्के वाढ दर्शविण्याचे उद्दिष्ट आहे.शेवटच्या तिमाहीत अनेक नवे प्रकल्प सादर होणार असून कंपनीला आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करेल.

ब्रँडचा विस्तार यापुढेही वाढविण्यासाठी अंतर्गत प्रणाली आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्ससवर यावर्षी कंपनीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तंत्रज्ञानातील उच्च कार्यक्षमतेसाठी जागतिक मापदंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या सेल्सफोर्स आणि एसएपीची अंमलबजावणी व्हीटीपी रिअल्टी ने केली आहे. विक्रीपूर्व,विक्री आणि सीआरएल प्रक्रिया आता सेल्सफोर्स प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित झाले असून फायनान्स आणि अकाऊंटस तांत्रिक विभाग एसएपी प्लॅटफॉर्मवर स्थलांतरीत झाले आहे. एसएपी अमंलबजावणीमध्ये आघाडीची कंपनी असलेली आयबीएमचा यात सहयोग असून रिअल इस्टेटमधील सर्वोत्कृष्ट पध्दती अंगीकृत करत अचूकता आणि कामकाजावर अधिक नियंत्रण मिळविण्यास याची मदत झाली आहे. दोन्ही प्रणाली अखंडपणे एकत्रित काम करत असून ग्राहक मिळविण्यापासून ते प्रकल्प पूर्ण करेपर्यंत कामकाज आणि व्यवसायावर संपूर्ण देखरेख करता येते.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार

आज व्हीटीपी रिअल्टी देशभरातील सर्वोत्कृष्ट संस्थांमधून येणार्‍या उत्कृष्ट प्रतिभेची निवड करत असून गुणवत्ता आणि डिझाईनमध्ये सर्वोच्च मानके असलेली उत्तम घरे तयार करण्याच्या दृष्टीकोन आणखी मजबूत करत आहे.

भविष्य काळात व्हीटीपी रिअल्टी संपूर्ण पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करणार आहे. यामध्ये सुमारे 33 लाख चौ.फूट असलेला हिंजवडी फेज 1 मधील एकूण 3000 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल युनिट्स विकसित होत आहेत,त्याचबरोबर बावधनमध्ये सुमारे 7.5 लाख चौ.फूटचा  500 युनिट्सचा निवासी प्रकल्प आणि प्लॉट्स, कॉटेज आणि लक्झरी व्हिला यांचा समावेश असलेली खडकवासला येथे 150 एकर भव्य टाऊनशिप विकसित होत आहे.

व्हीटीपी रिअल्टीचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले की,या क्षेत्रात महत्त्वाचे टप्पे गाठत असताना, व्हीटीपी लिओनारा आणि व्हीटीपी  बेलएअर या दोन आमच्या प्रारंभिक प्रकल्पांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. हे प्रकल्प टाउनशिप कोडनेम ब्लू वॉटर मधील पहिल्या प्रकल्पांपैकी होते आणि आज ते वितरित केले जात आहेत. हे प्रकल्प त्या किंमतीच्या श्रेणीतील बाजारातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.

अधिक वाचा  देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या  षडयंत्रात 'उबाठा' ही सहभागी - माधव भांडारी यांचा हल्लाबोल

गुणवत्तापूर्ण प्रकल्प वितरित करणे आणि आमच्या कामाच्या प्रक्रियांमध्ये सुधार  करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या आमची वचनबद्धतेने हा उल्लेखनीय टप्पा  पार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. कार्यक्षमतेसाठी आणि अंमलबजावणी क्षमतेसाठी ओळखल्या जाणार्‍या व्यावसायिकांची मजबूत टीम तयार करण्यासाठी व्हीटीपी रिअल्टी ने अंतर्गतरित्या,आपली संसाधने एकत्रित केली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील काही उत्कृष्ट प्रतिभा असण्याचा आम्हाला अभिमान आहे,ज्यांनी आमच्या यशामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आमच्या महत्वाकांक्षी विस्तार योजनांसाठी आम्ही सक्रियपणे मजबूत प्रणाली लागू केल्या आहेत ज्यामुळे आम्ही भारतातील सर्वात विश्वासार्ह रिअल इस्टेट कंपनी बनण्याच्या मार्गावर आहोत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love