पुणे : इंटरनॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला माइण्ड वॉर्ससोबतच्या त्यांच्या विशेष सहयोगाची घोषणा करताना, तसेच भारताच्या विविध भागांमधील हजारो विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशीपसाठी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगताना आनंद होत आहे. इयत्ता ६वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पात्रता चाचणीसाठी नोंदणी केली आहे आणि माइण्ड वॉर्स अॅपवर त्याचा सराव करत आहेत.
माइण्ड वॉर्स एनएसी (नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीप) विद्यार्थ्यांना त्यांची योग्यता कौशल्ये दाखवण्यासाठी आणि जगभरातील सर्वात हुशार सहभागींसोबत स्पर्धा करण्यासाठी अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे महत्त्वपूर्ण विचार, तर्कशुद्ध कल्पना व समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
हे स्पर्धक माइण्ड वॉर्स अॅप्लिकेशनवर उपलब्ध असलेल्या मोफत सराव चाचण्यांचा वापर करत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी स्वतःला तयार करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याच्या महत्त्वामुळे बहुतेक शाळांमध्ये स्वारस्य निर्माण झाले आहे आणि ते विद्यार्थ्यांना एनएसीसाठी तयारी करण्यास मदत करण्यासोबत त्यांची शैक्षणिक कौशल्ये सुधारण्यास सहभागी होण्यासाठी उत्सुकतेने प्रोत्साहित करत आहेत.
झी एंटरटन्मेंट एंटरप्राइझेस लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष उमेश के. बंसल म्हणाले, आम्हाला इंटरनॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपसोबतच्या आमच्या सहयोगाचा अत्यंत अभिमान वाटतो. भारत भरातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून शैक्षणिक सर्वोत्तमतेला प्रेरित करणाऱ्या आणि तरूणांना आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी देणाऱ्या अशा व्यासपीठांची गरज दिसून येते.
ही स्पर्धा गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, इंग्रजी व सामान्य अभियोग्यता यांसह अनेक श्रेणींमध्ये विभागली गेली आहे आणि इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. नोंदणी मर्यादित आहे आणि फक्त पुढील काही दिवसांसाठी स्वीकारली जाईल. इच्छुक विद्यार्थी ९६२५९३३४३४ वर माइण्ड वॉर्स टीमशी संपर्क साधून देखील सहभाग घेऊ शकतात.