नारायण राणे असे म्हणताच फडणविसांनी जोडले हात ..


पुणे -नारायण राणे  पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.  यावेळी नारायण राणे यांनी, माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण तो व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो असे म्हणाले. नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले तेव्हा एकच हशा पिकला.

राणे म्हणाले, दिल्लीत आता मी सुखी आहे. महिन्याला पुण्यात येणारा माणूस चार महिन्यांनी पुण्यात आला.  तुमच्या माझ्यातल अंतर यांनी वाढवलं याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत, असं नारायण राणे म्हणाले. हातातलं घड्याळ बीजेपीचं  नाही, राष्ट्रवादीच आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

अधिक वाचा  खुशाल गुन्हा दाखल करा; अनिल देशमुखही अशाच धमक्या देत गेले: कोणाला म्हणाले असे चंद्रकांत पाटील?

दरम्यान, बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे काम केलं, घटना लिहिली, त्या घटनेच कौतुक सगळीकडे होत. मराठा आरक्षणाबद्दल खुप आंदोलन झाली, विरोधकांनीही खुप टीका केली, हे आरक्षण घटनेत बसत नाही असे सांगण्यात आलं.  मग, तज्ञांनी उत्तर दिलं घटनेच्या कलम 15 /4 प्रमाणे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांच अनुकरण करा, असं नारायण राणे म्हणाले. आत्मनिर्भर होण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक एक गुण आत्मसात केला तर अमेरिका आणि चीननंतर आपला देश महासत्ता होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love