तर.. नरेंद्र मोदी काय चीज आहे?- शरद पवार

What is Narendra Modi cheese?
What is Narendra Modi cheese?

पुणे(प्रतिनिधि)— “ज्या देशामध्ये ज्यांचं राज्य साम्राज्य कधी मावळणार नाही, असं म्हणारे इंग्रज आपल्या देशात होते. त्या इंग्रजांनी आपल्यावर वर्षानूवर्षे राज्य केलं. त्यांचं राज्य घालवण्यासाठी संपवण्यासाठी देशातले कोट्यवधी लोक गांधींच्या विचाराने एकत्र आले आणि इंग्रजांची सत्ता घालवण्यात यशस्वी झाले. त्या इंग्रजांना गांधींनी घालवलं तर नरेंद्र मोदी काय चीज आहे? अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. दरम्यान, राहुल गांधी यांची टिंगल टवाळकी मोदी-शहा करत आहेत, असा आरोप करतानाच देशासाठी नरेंद्र मोदी यांचं काय योगदान आहे, असा सवालही त्यांनी केला.

शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुण्यातील हडपसर येथे आयोजिट सांगता सभेमध्ये पवार बोलत होते. काँग्रेस आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री बाळासाहे शिवरकर, अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार महादेव बाबर आणि इतर नेते उपस्थित होते.

अधिक वाचा  पुण्यात लॉकडाऊन की एप्रिलफूल? - अजित दादांच्या निर्णयाकडे लक्ष

पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाई आणि गांधी परिवारावरून नेहमी टीका आणि आरोप करत असतात. पण, एक तरुण देशभरात पद यात्रा करत फिरत आहे. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्याची टिंगल टवाळकी करत आहेत. गांधी आणि नेहरू परिवाराने देशाच्या स्वातंत्र्यासाठी  मोठं योगदान दिलं. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी काय केलं, असा थेट सवाल ही शरद पवारांनी केला.

लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करत आहेत

दरम्यान, चाकण येथील जाहीर सभेत बोलताना पवार म्हणाले, जवाहर नेहरू इंदिरा गांधीसह जे जे पंतप्रधान झाले, त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या आहेत. मात्र, त्यापेक्षा लाजिरवाणी भाषा पंतप्रधान मोदी करत आहेत, असा हल्लाबोल शरद पवारांनी केला.

अधिक वाचा  पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा मित्र परिवारा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा

हा देश लोकशाही देश आहे. जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे. लोकशाहीची आस्था जगाला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी लोकशाहीवर संकट आणू पाहत आहेत, अशी पवार यांनी केली.

 शरद पवार म्हणाले, येणाऱ्या सरकारकडे जगाचे लक्ष आहे. हा देश लोकशाही असलेला देश आहे. लोकशाहीवर मोदी आणि त्यांचे सहकारी संकट आणू  पाहत आहेत. त्यांना घटना आणि संविधान बदलायचे आहे. यावेळी टीका व्हायला लागली त्यावेळी मोदी सांगू लागले आम्ही घटनेला हात लावणार नाही. घटना बदल्याण्यासाठी मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन भाजप नेते करीत आहेत. त्यासाठी ४०० खासदार निवडून द्या, असे ते म्हणत आहे.  याचा अर्थ हा असा आहे कि तुमच्या आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा डाव त्यांनी तयार केला आहे. त्यापासून आपण सावध भूमिका घेतली नाही तर हिंदुस्थानची लोकशाही धोक्यात जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love