शिवसेना यूपीएत गेली तर त्याने काय फरक पडणार आहे? – नारायण राणे

राजकारण
Spread the love

पुणे— शिवसेनेने हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे,अशी टीका करत शिवसेना यूपीएत गेली तर त्याने काय फरक पडणार आहे? अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

शिवसेना यूपीएत सामील होण्याची चर्चा सुरू आहे त्याबाबत राणे यांना विचारले असता, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना वरील मत व्यक्त केले. भाजपच्यावतीने पदाधिकारी तसेच बूथ कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते

राणे म्हणाले, शिवसेना यूपीएत गेली तरी काय फरक पडणार आहे. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे 303 खासदार आहेत. यूपीएत जाऊन काय होणार आहे,? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेची आयडॉलॉजी हिंदुत्वाची आहे. मात्र, शिवसेनेने हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे, अशी टीकाही राणे यांनी शिवसेनेवर यावेळी केली.

फुगवून फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात –

संजय राऊत हे मनाला येईल तसं काहीही बोलत असतात, काहीही सांगत असतात. ते देशावर देखील बोलतात.  दिल्लीत सत्ता येईल का? महापालिकेत 10 नगरसेवक आहेत. फुगवून-फुगवून किती फुगवेल मग फुगत नाही आणि फुटतात त्याला संजय राऊत म्हणतात, असा टोला देखील यावेळी राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

मध्यंतरी सत्ता परिवर्तनबाबत मी विधान केले होते. त्याबाबत जे काही युक्तिवाद आहे ते सांगायचे नसतात. सत्ता पडल्यानंतर सांगू. एक दोन वेळा कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावं लागतं. तसेच एखाद्या दिवशी सत्ता खरंच पडेल, असे देखील राणे यावेळी म्हणाले.

राज्याचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे म्हणून ते आकडे फुगून दाखवत आहेत. ओमायक्रॉनचे पुणे आणि मुंबईत रुग्ण सापडले आहेत. चाचण्या होऊ द्या, तपासणी होऊ द्या मग बघू, आतापासूनच एवढे निर्बंध घालणे हे योग्य नाही. एकतर दोन वर्षात लोकांची आर्थिक स्थिती फारच विक झाली आहे. त्यात आत्ता भर टाकू नये, असे देखील यावेळी राणे म्हणाले.

100 पेक्षा अधिक जागा येणार –

आज पुण्यात भाजपच्यावतीने अभियान ठेवण्यात आले आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. भविष्यात महापालिकेच्या आणि अन्य होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपात काम केलं पाहिजे यासाठी हे अभियान आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेत आता 97 जागा आहेत. पण त्या 100 च्या पुढे कशा पद्धतीने जाता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी काय काय करावे यासाठी कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता यावी यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेही यावेळी राणे म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *