मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार

Multimodal hub will transform Swargate Chowk
Multimodal hub will transform Swargate Chowk

पुणे(प्रतिनिधि)–मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाण नगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोहोळ पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक एकमेकांशी जोडले जाणार आहे. मेट्रोच्या मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बस स्थानक होणार आहे. कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. हबमध्ये व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहे. मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  ..त्यावर मी काय बोलणार? सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवारांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया