एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश

Mohol ordered the suspension of the police inspector
Mohol ordered the suspension of the police inspector

पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज (L3 – Liquid Leisure Loung) या पबमधील स्वच्छता गृहात ड्रग्जचे सेवन केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर पुण्यात नेमकं काय चाललं आहे? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हेही आक्रमक झाले असून त्यांनी ‘पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही’ असे म्हणत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा  बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च

मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॅाटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love