पुणे(प्रतिनिधि)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुणे शहरात रेस कोर्स मैदानावर महायुतीच्या पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभा होत आहे. आजची मोदीजींची सभा ही एक ऐतिहासिक सभा होईल असा विश्वास पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मोदीजींवर टीका करणाऱ्या विरोधकांना आजच्या सभेने धडकी भरली आहे असेही मोहोळ म्हणाले.
मोदींची सभा, सभेची तयारी आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केली जाणारी टीका याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, आम्हाला असं वाटतं पुढच्या भविष्यात पुणेकरांच्या खूप दिवस लक्षात राहील अशी ही सभा असेल. जवळपास 2 लाख लोक येतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने खूप तयारी केली आहे. वाहतुकीची कुठली कोंडी होणार नाही यांची काळजी घेण्यात आली आहे. पार्किंग आणि इतर सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने केल्या आहेत.
विरोधकांना धडकी भरली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येतात मात्र विरोधक मात्र टीका करतात कारण विरोधकांना धडकी भरली आहे. मोदीजी पुण्यात येणार म्हटल्यानंतर सर्वकाही स्वच्छ दिसते आहे. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या निराशेपोटी आणि मोदींबद्दलच्या द्वेषापोटी ते टीका करतात. मोदीजींबद्दलचा द्वेष त्यांच्या मनात इतका खचून भरला आहे की त्यामुळे द्वेषापोटी आणि भीतीपोटी ते टीका करतात.
मोदींच्या चेहऱ्याचा मोहोळांकडून केला जातो अशी टीका विरोधकांकडून केला जातो त्याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, पुणेकरांना चांगलं माहिती आहे की उमेदवार म्हणून जरी मी असलो तरी ही निवडणूक देशाची आहे. मोदीजींचं नाव घेतलच पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे. माझं काम मी पुणेकरांसामोर ठेवले आहे आणि ठेवतो आहे, लोकांनाही माहिती आहे. माझ्याकडे सांगायला खूप काही आहे, विरोधकाकडे सांगायला काही नाही. पण ही देशाची निवडणूक आहे. ही सार्वत्रिक निवडणूक हे ठरविणार आहे की देशाचा प्रधानमंत्री कोण असणार. माझ्या नेत्याचे नाव घेताना मला अभिमान वाटतो. त्यांना त्यांच्या नेत्याचे नाव घेतले की आपण निवडणुकीत पडतो की काय अशी भीती वाटते. त्यामुळे लोकांनाही माहिती मोदीजी कुठं आणि राहुल गांधी कुठं? त्यामुळे त्यांच्या नेत्याचे नाव घेतल्यास लोक मते देणार नाहीत अशी भीती त्यांना वाटते.
मला मात्र माझ्या नेत्यांचे नाव घेतलेच पाहिजे. कारण त्यांनी कामच केले आहे. त्यांनी देशासाठी आणि पुण्यासाठी केलेलं काम आपल्या समोर आहे. त्यामुळे मी अभिमानाने मोदीजींचे नाव घेतो.
पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील १० वर्षात भरपूर काही दिलं. येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार बरंच काही देणार, असा विश्वास आहे. आज मोदींची पुण्यात सभा आहे ही पुणेकरांनी चांगली बाब आहे. पुणेकरांना मोदींना बघायला मिळणार आहे शिवाय त्यांना ऐकायलादेखील मिळणार आहे. या सगळ्यासाठी पुणेकर उत्सुक आहे. आतापर्यंतच्या सभेतली सगळ्यात चांगली आणि मोठी सभा आजची होणार, असं दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.