पुणे–लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या गॅरेटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रावर व्यक्त केली आहे.
जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम मंदीर बांधणे आणि काश्मिरमधील ३७० कलम हटवण्याबरोबरच समान नागरी देशात आणण्याचा संकल्प पक्षाने केला होता. देशातील मतदारांनी पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवून केंद्रात बहुमताने सलग दोन वेळा सरकार निवडून दिले आणि देशवासीयांना अयोध्येत रामाचे दर्शन घेता येऊ लागले, तसे काश्मिरमध्ये मुक्तसंचार करता येऊ लागला आहे. पुढील पाच वर्षात समान नागरी कायद्यासह काही मोठी उदिष्ट ठेवली आहेत. ती सर्व पूर्ण होतील, या मोदीजींच्या गॅरेंटीवर देशवासीयांचा आणि पुणेकरांचा विश्वास आहे. देशवासीयांच्या विश्वासावरच हे मोदीजींच्या गॅरेंटीचे संकल्पपत्र देशवासियांसमोर मांडले आहे, असे मोहोळ यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.















