पुणे: देशातील अग्रगण्य आभूषण विक्रेत्या साखळी दालनांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे नवीन दालनाचे फिनोलेक्स चौक, पिंपरी येथे नुकतेच उद्घाटन झाले. पारंपारिक आणि समकालीन अभिरुचीनुसार आणि जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभवाच्या अभिवचनासह विस्तृत श्रेणीचा संग्रह असलेले, ही नवीन शोरूम महाराष्ट्रात ब्रँडच्या झपाट्याने विस्तारणाऱ्या उपस्थितीला अधिक चालना देणारे असल्याचा दावा मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वतीने करण्यात आला आहे.
शोरूमचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ब्रँडचे जगभरातील १० देशांमध्ये २६० हून अधिक शोरूम आहेत.
शोरूममध्ये १००% बीआयएस हॉलमार्क केलेले शुद्ध सोने, हिरे, मौल्यवान रत्ने आणि प्लॅटिनम यांसह पारंपरिक महाराष्ट्रीय दागिने, वधूसाठी विविध डिझाईन्सची आभूषणे, मंगळसूत्र आणि प्राचीन दागिन्यांमध्ये तयार केलेल्या नवीनतम डिझाईन्सचेदागिने पाहता येतील. स्टोअरमध्ये हस्तकारागिरीने घडविलेले एथनिक्स दागिने, माइन डायमंड्स, एरा अनकट ज्वेलरी, प्रेसिया जेमस्टोन ज्वेलरी, झोल लाइफस्टाइल ज्वेलरी फॉर मिलेनिअल्स, स्टारलेट किड्स ज्वेलरी आणि यासारख्या काही विशेष समर्पित उप-ब्रँड्स ग्राहकांना पाहता येतील.
मलाबार समूहाचे अध्यक्ष एमपी अहमद म्हणाले, “जागतिक दर्जाच्या सेवा आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांमुळे आम्हाला जगभरातील सर्वात विश्वसनीय भारतीय ज्वेलर्स बनण्याचा बहुमान मिळविता आला आहे. मला खात्री आहे की पुण्यातील लोकांना आमचे नवीन दालन आणि दागिने त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या सोहळ्यांसाठी सुयोग्य वाटतील आणि सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार.”
मलाबार ब्रँडचा महाराष्ट्रात निरंतर विस्तार सुरू आहे. येत्या काही महिन्यांत सोलापूर तसेच पुण्यातील हडपसर आणि औंध येथे नवीन स्टोअर्स सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. व्यवसाय पद्धतींमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सुप्रसिद्ध, ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ आणि ‘फेअर प्राईस प्रॉमिस’ यांसारख्या ब्रँडच्या विशिष्ट प्रस्तुतींना ग्राहकांना प्रतिसाद दिला आहे. या प्रस्तुतीमधून देशभरात एकसमान सोन्याचे दर प्रदान करण्याची वचनबद्धता दर्शविते, तर महाराष्ट्र बाजारपेठेत ७.९ टक्क्यांपासून सुरू होणार्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी वाजवी घडणावळ शुल्क निर्धारीत करते. दोन्ही उपक्रमांचा उद्देश ग्राहकांना त्यांनी मोजलेल्या पैशासाठी सर्वोत्तम मूल्य प्रदान करणे असाच आहे.
शिवाय, मलाबार गोल्ड आणि डायमंड्स आपल्या ग्राहकांना १० प्रकारच्या आश्वासनांची हमी देतो. या आश्वासनांमध्ये अचूक घडणावळ खर्च (मेकिंग चार्जेस), स्टोन वेट, नेट वेट यासह पारदर्शक किंमतीची खूणचिठ्ठी आणि ज्वेलरीचे स्टोन चार्ज, ज्वेलरीसाठी आजीवन देखभाल, एक्सचेंजवर शून्य कपात, सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे १०० टक्के बीआयएस हॉलमार्किंग, आयजीआय आणि जीआयए दर्शवणारे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. हिऱ्यांबाबत जागतिक मानकांची २८ सूत्री गुणवत्ता तपासणी, बायबॅक हमी, जबाबदार सोर्सिंग आणि न्याय्य कामगार पद्धतीही समूहाने सुनिश्चित केली आहे.
समूहाच्या सामाजिक दायीत्व अर्थात सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सद्वारे घाटकोपर शोरूमने मिळवलेल्या नफ्याच्या ५% हिस्सा या क्षेत्रातील विविध सेवाभावी आणि परोपकारी कार्यांसाठी वितरीत केला जाईल, असे अहमदयांनी सांगितले.