महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा काम बंद आंदोलनास पाठिंबा :फ्रंट लाईन वर्कर्स घोषीत करण्याची मागणी


पुणे–महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील 6 प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने  सोमवार दिनांक 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशार दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12000 पेक्षा जास्त  सदस्य या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले आहे.  

या आंदोलनात कंत्राटी कामगार हिताच्या मागण्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

*आंदोलनातील प्रमुख मागण्या*

1 ) वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन शासन लाभ मिळावेत.

अधिक वाचा  तीन हजार तांड्यांवर बंजारा समाजाचे धर्मांतर; सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणणार - पू. बाबूसिंगजी महाराज

2 ) फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला सुद्धा लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे.

3 ) कोरोना बाधित कंत्राटी कामगाराला 30 ऐवजी 50 लाखाचे सानुग्रह अनुदान मिळावे.

4 ) कोविडचा उद्रेक पाहता काळात वीज बिल वसुली सक्ती करू नये.

कोविड काळात 46 कंत्राटी कामगार अपघाताने मृत पावले तर अनेक जण कोविडमुळे  मृत पावले. शेकडो कंत्राटी कामगार व त्यांचे कुटुंबीय सुद्धा कोविड बाधित झाले, यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने जून 2020 पासून महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री, उर्जामंत्रालय, प्रधान सचिव ऊर्जा, व तिन्ही वीज कंपनी प्रशासनाकडे शेकडो  पत्र व्यवहार केले. 5-6 आंदोलने , निदर्शने केली मात्र याकडे महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री, उर्जामंत्रालय, प्रधान सचिव ऊर्जा, व तिन्ही वीज कंपनी प्रशासनाने आजवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न ,जिव्हाळाच्या  मागण्या बाबतीत शासनाचे लक्ष वेधून  सकारात्मक भुमिका घ्यावी. अशी मागणी संघटनेने केली आहे.  वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे ( संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love