लसिकरणाच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इंस्टिट्यूट

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

पुणे – संपूर्ण देशात कोरोना वरील लसीच्या तुटवडा आहे. लसीच्या उपलब्धतेवरून केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. 45 वर्षापुढील वयोगटासाठीचे लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या पुरेश्या अनुपलब्धतमुळे लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. लसीकरणाच्या या चुकलेल्या नियोजनाला कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इंस्टिट्यूटने केंद्र सरकार जबाबदार असल्याचे निर्देशित केले आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करताना केंद्र सरकारने ना लशींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली ध्यानात घेतल्याचे स्पष्ट मत सिरम इंस्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी व्यक्त केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका शिखर परिषदेत बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं निर्धारित केलेली नियमावली समोर ठेवून त्यानुसार लोकांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा होता. सुरूवातीला ३०० मिलियन लोकांना लस दिली जाणार होती. त्यासाठी ६०० मिलियन डोसची गरज होती. सुरुवातीच्या उद्देशापर्यंत आम्ही पोहोचण्याआधीच ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण करण्याची आणि त्यानंतर १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारने परवानगी देऊन टाकली. आपल्याकडे यासाठी लागणाऱ्या लशींचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती असतानाही सरकारने ही परवानगी दिली. यातून आपल्याला हेच शिकायला मिळते की, लशींची उपलब्धता लक्षात घेऊन आणि त्याचं सुसंगत वितरण करायला हवे, असे जाधव म्हणाले.

या संकट काळात लसीकरण अत्यावश्यक आहे, पण लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे नागरिकांनी लस घेतल्यानंतरही कोरोना नियमावलीचे पालन करायला हवे. डबल म्युटेंटही निष्क्रिय करण्यात आलेले आहे. पण तरीही कोरोनाचा नवा स्ट्रेन लसीकरणात अडथळा निर्माण करू शकतो. कोणती लस कोरोनावर प्रभावी आहे आणि कोणती नाही, हे आताच सांगण घाईचे होईल. सीडीसी (अमेरिकेची रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र) आणि एनआयएचच्या माहितीनुसार जी लस उपलब्ध होत असेल, ती घ्यायला हवी, असेही जाधव म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *