Leopards Ran Away : पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून काल पसार झाला. १३० एकरांवर वसलेल्या प्राणी संग्रहालयात हा नर जातीचा बिबट्या पसार झाला. त्याला पकडण्यासाठी गेल्या २४ तासांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. (Leopards at the Rajiv Gandhi Zoological Museum, Katraj ran away)
सोमवारी सकाळी साधारणतः ९.३० वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पिंजऱ्याच्या वरच्या बाजूची सळई उचकटून तो प्रसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत प्रशासनाकडून सांगण्यात आले. वन विभाग, अग्निशमन दल, पोलीस यांच्यासह इतर रेस्क्यु टीम या ठिकाणी दाखल झाले असून बिबट्याचा कसून शोध घेतला जातो आहे.