पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी

पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी
पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी

पुणे-  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उद्या (ता. २६) मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी बुधवारी रात्री उशिरा काढला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी (ता.२६) सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवसे यांनी जारी केले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  रा. स्व. संघ जनकल्याण समितीला क्रीफ सोलुशन प्रा. लि. कंपनीने दिली आयसीयू लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका