राज्यात महिला बचत गटाचे सर्वाधिक जाळे – संजय निरुपम

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–महिला सबलीकरणाचे देशात सर्वत्र काम सुरु आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांनी या कार्याची सुरुवात केली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्‍त ठरणार्‍या महिला बचटगटांची चळवळ देशभर सुरु आहे. देशात महिला बचतगट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ही कौतुकाची बाब आहे, असे मत माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आज व्यक्‍त केले. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांचे कार्य अतुलनीय असून या कार्याला हातभार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले.

पुणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रियदर्शनी वुमेन्स फोरम व पायल तिवारी बिटीया फाऊंडेशनच्यावतीने काँग्रेसभवन प्रागंणात भरविण्यात आलेल्या ‘गौरी गणपती साहित्य जत्रे’चे उदघाटन माजी खासदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हासदादा पवार, जत्रा महोत्सवाच्या आयोजिका व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी, माजी आमदार दिप्ती चवधरी, देवमाणूस फेम अभिनेत्री प्रतिक्षा जाधव, अभिनेत्री आरती शिंदे, माजी नगरसेवक विरेंद्र किराड, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सुजात शेट्टी, रफीक शेख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निरुपम म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध कौशल्य, कलाकुसरीचे व्यवसाय करुन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. महिला बचतगटाचे काम ही संस्था पुढे नेत आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र महिला बचतगटाच्या कामात अग्रेसर आहे. महिलाशक्‍ती ही संपुर्ण कुटूंबाला पुढे घेऊन जाते. तिवारी फाऊंडेशनने महिलांसाठी मोठे व्यासपीठ तयार करुन दिले असून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम त्या   करीत आहेत. याचे कौतुक  निरुपम यांनी यावेळी केले.

उल्हास पवार म्हणाले, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचतगटाचे काम कौतुकास्पद आहे. गेली 13 वर्षे गौरी गणपती साहित्य जत्रा भरविण्यात येते. हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी महिला पुढे येत आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

अभिनेत्री आरती शिंदे म्हणाल्या, कोरोना काळात महिलांनी बचतगटांमार्फत आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार दिला. प्रत्येक महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी नवनवीन शिकणे गरजेचे आहे.

अरविंद शिंदे म्हणाले, महिला बचतगटांना व्यासपीठ तयार करुन देणे कष्टाचे काम आहे. 13 वर्षे अविरतपणे हा उपक्रम सुरु असून महिलांना जोडण्याचे काम सुरु आहे.

आयोजिका संगीता तिवारी यांनी प्रस्ताविक केले. गेली 13 वर्षांपासून ‘गौरी गणपती साहित्य जत्रा’ काँग्रेस भवन येथे भरविण्यात येते. महिलांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळतो.

यंदा 70 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. सर्व पूजेचे साहित्यासह “वाती ते मूर्ती” सर्वप्रकारचे साहित्य एकाच छताखाली मिळणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत  गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सव खुला असणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. तर सुवर्णा माने यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास मोठी गर्दी होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *