रिलायन्स फाऊंडेशन तर्फे कोविड रूग्णांसाठी मोफत 875 बेडची सुविधा

पुणे-मुंबई
Spread the love

मुंबई- देशातील औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईत कोविडच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने रूग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. फाउंडेशनने मुंबईतील 875 कोविड बेडचे काम हाती घेतले आहे. Free 875 beds for Kovid patients by Reliance Foundation सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल 1 मेपासून कोविड रूग्णांसाठी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे 550 खाटांच्या कोविड युनिटची देखभाल करेल. येथे 100 बेडचे आयसीयूदेखील तयार केले जात आहे. 15 मेपासून गंभीर रुग्णांना येथे प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

याशिवाय बीकेसी, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये लक्षणे नसलेल्या एसीम्प्टोमॅटिक रूग्णांसाठी 100 बेड तयार केले जात आहेत. मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील रिलायन्स फाउंडेशनच्या डॉक्टरांनीही देशातील पहिले कोविड रुग्णालय तयार केले होते. येथे फाउंडेशन 100 रूग्णांवर देखरेख ठेवत होता. त्याची क्षमताही वाढविली जात आहे. रिलायन्स फाऊंडेशन आता येथे आयसीयूच्या  45 खाटांसह 125 रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी घेईल असे रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ आयडिया आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सर्व कोरोना रूग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात. नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथील सुविधा आयसीयू बेड, मॉनिटर्स, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय संबंधित मशीन आणि 650 बेडसारख्या सर्व वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाऊंडेशन उचलणार आहे. रुग्णांना मदत करण्यासाठी डॉक्टर आणि परिचारकांसह फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचे 500 हून अधिक सदस्य चोवीस तास सज्ज राहतील.

कोविड रूग्णांच्या उपचारासाठी रिलायन्स फाऊंडेशनने घेतलेल्या नवीन उपक्रमांबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीता अंबानी म्हणाल्या, “रिलायन्स फाउंडेशन हे देशाच्या सेवेत नेहमीच अग्रणी राहिले आहे आणि साथीच्या रोगा विरुद्ध होणाऱ्या या लढाईत भारताला पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. रूग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवून, आमच्या डॉक्टरांनी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्नातून बर्‍याच रुग्णांचे आयुष्य वाचविण्यात मदत केली. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मुंबई शहरात कोविड रूग्णांसाठी एकूण 875 बेडचे व्यवस्थापन करेल. ”

“आम्ही गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दमण, दीव आणि नगर हवेली येथे दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन विनामूल्य प्रदान करतो. ऑक्सिजनचे उत्पादन आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही या वाईट टप्प्यात भारत आणि मुंबईला मदत करण्यास वचनबद्ध आहोत, एक भारतीय म्हणून आम्ही आमच्याकडून जे काही आवश्यक आहे ते करू. कोरोना हरणार भारत जिंकणार”!

गेल्या वर्षी रिलायन्स फाऊंडेशनने 5.5 कोटी लोकांना “अन्न सेवा” अंतर्गत अन्न पुरविले होते. हा कठीण काळातला जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *