खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या


पुणे- जीवश्य कंठस्य मैत्रिणी असलेल्या १९ वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. हडपसरजवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. त्या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

आकांक्षा औदुंबर गायकवाड आणि सानिका हरिश्चंद्र भागवत अशी आत्महत्या केलेल्या या दोन्हीही मैत्रिणींची नावे आहेत. दोघेही १९ वर्षाच्या आहेत.शेवाळवाडी गावातील अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत हा प्रकार घडला. दोघींनीही एकाच वेळी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आकांक्षा आणि सानिका दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

अधिक वाचा  मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो,मंत्री होतो, पण आमचं काय?: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

दरम्यान, सानिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना आकांक्षाने पाहिले आणि तिने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडीमारली. ती देखील रुग्णवाहिकेजवळच येऊन पडली. यामध्ये गंभीररीत्या जखमी झाल्याने तिचा देखील मृत्यू झाला. या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love