तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता परंतु मराठ्यांना दाबू शकणार नाही : जरांगे पाटलांचा मुंबईला धडकण्याचा इशारा

Jarange Patal's warning to attack Mumbai
Jarange Patal's warning to attack Mumbai

Manoj Jarange’s warning to the state government : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता राज्य सरकारला (State Govt.) इशारा (Warning) दिला आहे. जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलन ( Maratha Reservation Movement) आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये (Beed) इशारा सभेमध्ये आता अंतरवाली सराटी (Antarwali sarati) नंतर थेट मुंबईला (Mumbai) धडक देण्याचा इशारा देतानाच येत्या 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण (Fasting to death) करण्याची घोषणा केली. (Jarange Patal’s warning to attack Mumbai)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला असताना त्यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकार तर्फे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan), उदय सामंत(Uday Samant) आणि संदिपान भुमरे (sandipan Bhumare) यांनी त्यांच्याशी अंतरवाली सराटी येथे जाऊन चर्चा केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण प्रश्नासंबंधी मागासवर्गीय आयोगाचा (Commission for Backward Classes) अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन (Special Session) घेण्याची घोषणा केलेली आहे.  त्यामुळे सरकारला वेळ द्यावा अशी भूमिका गिरीश महाजन यांनी यावेळी मांडली. तसेच जरांगे पाटील हे ‘सोयरे’ या शब्दावर अडून बसल्यानंतर जरांगेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी सगळे सोयरेचा अर्थ तुम्ही मामा-मामी असा गृहीत धरला, बायकोला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही.  आजोबा काका मुलांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेल, मुलांना त्यांच्या वडिलांची जात लागेल असे स्पष्टपणे सांगितले. मात्र, जर आई  कुणबी असेल तर मुलांना कुणबी  प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.  त्यामुळे यावर बराच वेळ चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही.

अधिक वाचा  शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित

त्यानंतर जरांगे पाटील यांनी शनिवारी बीडमध्ये इशारा सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.  मराठा समाजाकडून आता पुढील आंदोलन मुंबईत आजार आझाद मैदानावर होणार आहे.  20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी या जाहीर सभेत केली.

सरकार केवळ झोपेचे सोंग घेत आहे आणि वेळ काढूपणा करून मराठा समाजाची फसवणूक करत आहे असा आरोप करून जरांगे पाटील म्हणाले, आता मराठ्यांना सांगायचं आहे की आपल्याला केवळ लढायचं नाही तर जिंकायचं आहे.  त्यामुळे आता अंतरवाली सराटीनंतर थेट मुंबईला धडकायचं आहे.

मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्यासारख्यांचा त्याला लाभ दिला जात आहे अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.  मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी 18 जानेवारी पर्यंत नोटीसा दिल्या आहेत. त्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकता परंतु मराठ्यांना दाबू शकणार नाही, आत्तापर्यंत खूप झालं”, आता मुंबईत मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love