आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे हे स्पष्ट- सचिन अहीर


पुणे-सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून यातून स्पष्ट होतंय की सध्या आगळं वेगळं दबावतंत्र वापरलं जात आहे. ही चौकशी नंतरही करता आली असती. पण आज संजय राऊतांनी जी आघाडी घेतली आहे, त्यापासून त्यांना रोखण्याचा हा प्रयत्न होतो आहे अशी टीका शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले असले तरीही निर्भीडपणे ते जनतेसमोर वस्तुस्थिती मांडणार, असेही अहीर म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असताना आता सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला आहे. त्यांना उद्या (मंगळवार) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले असून, गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. यावरून शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी आज माध्यमांशी बोलताना टीका केली आहे.

अधिक वाचा  टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी

आमदारांच्या निलंबनाविषयी बोलताना ते म्हणाले,  “सध्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया ही विधानसभा उपाध्यक्षांसमोर आहे. त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतलेलाच नाही, तोपर्यंत यांनी याचिका न्यायालयात दाखल केली. मात्र, माझ्या ज्ञानानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेचा निर्णय येईपर्यंत यात हस्तक्षेप करणार नाही. घटनेनुसार जर हे झाले असते तर ते चाललं असतं. शिवाय महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतला हे न्यायालयात सांगीतले, म्हणजे न्यायालय शासनाला आदेश देतील, असं कधी होत नाही. घटनेनुसार विधीमंडळ, मग राज्यपालांकडे प्रकरण जातं. त्यामुळं तूर्तास तरी न्यायालयात जाऊन सांगणं हे घटनेत बसत नाही. मात्र शेवटी न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल.” असंही यावेळी आहिर यांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love