रिलायन्‍स ज्‍वेल्‍सकडून यंदाच्‍या उत्‍सवी हंगामासाठी नवीन ‘उत्‍कला’ कलेक्‍शन सादर


मुंबई- रिलायन्‍स ज्‍वेल्‍स या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ज्‍वेलरी ब्रॅण्‍डने उत्‍सवी हंगामाच्‍या शुभारंभानिमित्त आकर्षक दागिन्‍यांची रेंज ‘उत्‍कला’ सादर केली आहे. हे कलेक्‍शन ‘ओडिशा’च्‍या सांस्‍कृतिक परंपरांमधून प्रेरित आहे. या कलेक्‍शनमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण रचना, नमुना व डिझाइन्‍सचा समावेश आहे, ज्‍यामधून परिपूर्ण कलाकृती, परंपरा व संस्‍कृती दिसून येते.


या खास कलेक्‍शनमध्‍ये आकर्षक डिझाइन्‍सचा समावेश आहे, जेथे ग्राहक सूक्ष्‍मपणे डिझाइन करण्‍यात आलेल्‍या आणि काळजीपूर्वक बनवण्‍यात आलेल्‍या दागिन्‍यांमधून निवड करू शकतात. ही सर्वोत्तम कलाकृती प्रतिष्ठित कोनार्क सन मंदिर कला, मुक्‍तेश्‍वर मंदिर कला, पुरी जगन्‍नाथ मंदिर कला, सीन्‍थी नृत्‍यकला, बोइता बंधना सागरी वारसा आणि विदेशी पट्टाचित्रा चित्रकलेमधून प्रेरित आहे.

चोकर सेट्सपासून लहान हार ते लांब गुंतलेल्या आणि मोहक हारांच्या सेटपर्यंत, विविध प्रसंगी आणि बजेट्सनुसार अनुकूल अशी एक रेंज आहे. गोल्‍ड कलेक्‍शनमधील डिझाइन्स २२ कॅरॅट सोन्यामध्‍ये तयार केल्या आहेत आणि त्यात पुरातन व पिवळ्या सोन्याच्या परिष्कृत तसेच पिवळ्या सोने व प्राचीन फिनिशमध्‍ये जटिल फिलीग्री शैलीमधील उत्कृष्ट दागदागिने समाविष्ट आहेत. उत्सवी आणि समकालीन लुक्‍ससाठी आकर्षक १८ कॅरॅट सोन्यात तयार केलेले डायमंड सेट आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  रिलायन्स रिटेलमध्ये केकेआरची ₹ 5,550 कोटींची गुंतवणूक :सिल्व्हर लेकनंतर रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक KKR invests ₹ 5,550 crore in Reliance Retail