Lord Sri Ram is not a person; Triveni confluence of ideals, culture and devotion

#Apne Apne Ram : प्रभू श्रीराम ही व्यक्ती नव्हे; आदर्श, संस्कृती व भक्तीचा त्रिवेणी संगम

पुणे-मुंबई
Spread the love

Apne Apne Ram : “प्रभू श्रीराम(Prabhu Shriram) ही व्यक्ती नव्हे, तर आदर्श(Ideal), संस्कृती(Culture) आणि अखंड भारतवासीयांच्या मनामनात असलेल्या भक्तीचा त्रिवेणी संगम(Triveni confluence of devotion) आहे. अयोध्येतील(Ayodhya) रामजन्मभूमीवर(Ram Janmabhumi) प्रभू श्रीराम(Prabhu Shriram) विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासीयांसाठी दीपोत्सवच आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.(Lord Sri Ram is not a person; Triveni confluence of ideals, culture and devotion)

येत्या सोमवारी (दि. २२) अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान होत आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान (Sanskruti Pratishthan) आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास(Dr. Kumar Vishwas) यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम'(Apne Apne Ram) या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी चौबे बोलत होते.

टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप चैतन्य महाराज कबीर, प्रदीप गारटकर, विजय अप्पा रेणूसे, विजय जगताप आदी उपस्थित होते.

अश्विनीकुमार चौबे म्हणाले, “सनातनी संस्कृती, हिंदू धर्मातील प्रत्येकजण अयोध्येत साकारलेले राम मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहे. लाखो कारसेवकांनी ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाल्याचे समाधान आहे. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कारसेवक सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्यात घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील रामकथा ऐकण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक असतात. त्यांच्या शब्दात रामकथा ऐकण्याची संधी देणाऱ्या संस्कृती प्रतिष्ठान व शि. प्र. मंडळीचे कौतुक आहे.”

प्रास्ताविकात मुरलीधर मोहोळ म्हणाले, जगातील सर्वात सुंदर व भव्य मंदिरात रामलला विराजमान होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. पुणेकरांना डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देताना मला आनंद होतो आहे. अयोध्येत रामलला विराजमान होत असताना देशातील वातावरण राममय झाले आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न साकारत आहे, हा आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा क्षण आहे.”

येथे अयोध्येतील राममंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली असून, त्यावरील विद्युत रोषणाईने रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. बिट द अनबिटेबल डान्स ग्रुपने केलेल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *