आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे-डॉ. प्रमोद चौधरी


पुणे-कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला सक्षम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर विश्‍वास, कामाचा दर्जा आणि वेळ या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास. लवकरच आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारत हा चीनची जागा घेऊ शकेल, असा विश्‍वास प्रांज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्‍त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 81 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोरोनानंतरच उद्योगविश्‍व या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे उपस्थित होते. संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धांना रसिकलाल माणिकसेठ धारीवाल फाऊंडेशन यांनी प्रायोजकत्व दिले.

अधिक वाचा  पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द

याप्रसंगी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले की, कोविड हा भारतासाठी चांगला अनुभव आहे. कोरोना काळात सरकारने ही वेगवेगळ्या योजना राबवल्या. डिझीटल मिडीयाला ही चांगले व्यासपीठ मिळाले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक घरगुती उद्योगांना चालना मिळाली घरगुती बनावटीच्या वस्तूंच्या वापराकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. कोरोनाने लांब गेलेल्या लोकांना जवळ आणण्याचे काम केले आहे.

लॉकडाऊनचा फटका मोठ्या उद्योगांना कमी बसला असला तरी छोट्या उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर बंद पडले आहेत. तर दुसर्‍या बाजुला सॅनिटायझर, पीपीई किट, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर आदि गोष्टी ज्या आपण आयात करीत होतो त्या आता आपणच निर्यात करायला लागलो आहे. नवनवीन संशोधन, तरुणाईचा संशोधनासाठीचा उत्साह आणि नक्‍कीच आत्मनिर्भर भारत अभियानाचा फायदा दिसून येत आहे. दुसर्‍या बाजुला आपल्याला उद्योग व्यवसाय वाढविताना पर्यावरणाचा समतोल ही राखणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला जाणार

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशी यांनी तर खजिनदार सुनील जगताप यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love