पुणे – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग लोणी काळभोर येथे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी, महिलांचे समाजात आणि जगासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठात महिलांचा सहभाग अत्यंत मोठा आणि महत्वाचा आहे, यासाठी आम्हाला अभिमान वाटतो. या वर्षीची थीम ‘चॅलेंज टू चॅलेंज’ अशी आहे, जी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये लैंगिक पूर्वाग्रह आणि असमानतेला आव्हान देण्याच्या गरजेवर भर देत असल्याची भावना प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केली.
एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड म्हणाल्या की, एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून, एमआयटी एडीटी विद्यापीठाने नेहमीच सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवला आहे. येथे प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. शिकण्याची आणि वाढण्याची समान संधी दिली जाते. सर्व प्रकारच्या नोकऱ्या आणि मानवी प्रयत्नांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आहेत यावर विद्यापीठाचा ठाम विश्वास आहे. महिलांना त्यांची कौशल्ये आणि कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठ सक्रियपणे काम करत आहे.
दरम्यान डॉ. रश्मी उर्ध्वशे यांना प्रेरणादायी महिला पुरस्कार 2023-, कॅप्टन विदुल केळशीकर यांना चेंजमेकर अवॉर्ड २०२३, मंजुषा भावे यांना महिला उद्योजक उत्कृष्टता पुरस्कार, गौरी वाटूरकर यांना रायझिंग स्टार पुरस्कार, सोनाली शिंदे यांना न्यू एज समाजिक उद्योजकता पुरस्कार, डॉ. गीतांजली अभिजित वैद्य यांना कॉर्पोरेट लीडर पुरस्कार, शमिला ओसवाल यांना प्रेरणादायी महिला नेतृत्व पुरस्कार, डॉ. उमा बोडस यांना भारतीय ज्ञान प्रणाली आयकॉन पुरस्कार, शुभा गोखले यांना कलाकार पुरस्कार 2023, महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना एमआयटी-एडीटी महिला पुरस्कार, नॉन-टीचिंग महिला स्टाफंना स्त्रीरत्न उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार, तर यंग स्टार अवॉर्ड 2023 हा पुरस्कार विद्यापीठातील विद्यार्थिंनी यांना प्रमुख पुण्याच्या माजी महापौर पाहुणे राजलक्ष्मी भोसले, ऑल इंजिया फाऊंडेशन ऑफ डेफ वुमनच्या संचालिका राजलक्ष्मी राव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. एमआयटी स्कूल ऑफ फुडे टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. अंजली भोईटे, डॉ. अश्विनी पेठे, डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. किशोर रवांदे, डॉ. अतुल पाटील यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मंगेश कराड म्हणाले, की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, एमआयटी एडीटी विद्यापीठाने लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुढाकार घेतल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. युनिव्हर्सिटीने महिला विकास सेलची स्थापना केली आहे, ज्याचा उद्देश महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि सहाय्य मिळविण्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करणे हा आहे. महिला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा पाठपुरावा करण्यात मदत करण्यासाठी विद्यापीठ त्यांना अनेक शिष्यवृत्ती आणि अनुदान देखील देते आहे. “आम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना आणि समाजातील महिलांचे अमूल्य योगदान ओळखून आनंदित झालो आहोत. लिंग-सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यात आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा विश्वास आहे.” आमची युनिव्हर्सिटी लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिक न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी कार्य करत राहू.