चीनची कारस्थाने सुरूच;चीनच्या या सात लष्करी तळांवर भारताचे अत्यंत बारीक लक्ष

आंतरराष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद लष्करी पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप पूर्व लडाखमध्ये तणाव निवळलेला नाही. उलट चीनची कारस्थाने सुरूच असून भारतीय एजन्सीज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी हवाई दलाच्या कामांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे.

 सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , लडाखपासून जवळ असणारे होतान, गारगुनसा आणि काशगर त्यानंतर हॉपिंग, कोनका झाँग, लिनझी आणि पॅनगात या चीनच्या लष्करी तळांवर भारत अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहे. अलीकडच्या काळात ही सर्व एअरबेस खूपच सक्रिय झाली आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने अलीकडेच या तळांवर मोठया प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. शेल्टर्स उभारले आहेत. धावपट्टीचा विस्तार केला असून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे.

 सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ईशान्येकडील राज्यांसमोरचा लीन्झी एअरबेस मुख्यत: हेलिकॉप्टर तळ आहे. तथापि, चीनने भारतीय राज्यांवरील पाळत ठेवण्याचे काम वाढविण्यासाठी येथून हेलिपॅडचे जाळे विकसित केले आहे.

चिनी वायुसेना लढाख सेक्टरजवळ आपल्या सैनिकांना तैनात करत आहे. यात सुखोई -30 आणि जे-मालिका लढाऊ विमानांच्या चिनी आवृत्तीचा समावेश आहे. तथापि, भारतीय संस्था त्यांच्यावर उपग्रह आणि इतर माध्यमांवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवून आहेत.

चीनकडून वाढत्या लष्करी कारवायांना उत्तर देण्यासाठी भारतानेही या ठिकाणी आपली स्थिती बळकट करण्यास सुरूवात केली आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुखोई -30 एमकेआय, मिग -२ आणि मिरज -२००० लढाऊ आपल्या एअरबेसवर तैनात केले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *