स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक

पुणे-मुंबई राष्ट्रीय
Spread the love

पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले आहे. ते समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच भारत सशक्त स्वावलंबी करण्याचा संकल्प  रा.स्व. संघाने केला आहे. त्यासाठी  सर्व सज्जनशक्ती एकवटून विविध संस्था संघटनांना सोबत घेण्याचे कार्य संपूर्ण देशभर रा.स्व. संघ करीत आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक  नानासाहेब  जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नुकतीच कर्णावती ( अहमदाबाद) येथे रा.स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते.

प्रांत संघचालक नानासाहेब  जाधव पुढे म्हणाले की , कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच संघाचेही काम २०२० च्या तुलनेत जवळपास ९८ % ठिकाणी पूर्ववत सुरु झाले आहे. शाखांपैकी ६१ % शाखा विद्यार्थ्यांच्या तर ३९ % शाखा  तरुण व्यावसायिकांच्या आहेत. दरवर्षी  एक ते सव्वा लाख  तरुण  Join RSS  च्या माध्यमातून संघाशी जोडले जातात.

या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( स्वराज्य ७५ ) स्वातंत्र्य लढ्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, आदिवासी, महिला, शेतकरी, कामगार अशा सर्वच घटकांचा सक्रीय सहभाग हा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोच  सामाजिक राष्ट्रीय एकात्मता आणि स्वत्वाचा भाव सर्वदूर सुदृढ करण्याचे प्रयत्न रा.स्व. संघ  करीत आहे. या सोबतच स्वावलंबी भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पर्यावरणानुकुल, श्रमप्रधान, ग्रामीण आणि लघु उद्योगावर आधारित आधुनिक तंत्रांसह पारंपारिक कलांचा विकास करावा लागेल.  त्यासोबतच  सूक्ष्म वित्त संस्था,  कुटीरोद्योग, बचत गट आदिंना विचारात घेऊन मनुष्यबळ कौशल्य प्रशिक्षण आणि संशोधनास चालना देणारे अर्थ व्यवस्थेचे भारतीय प्रतिमान ( MODEL) सिद्ध करावे लागेल. असा  प्रस्ताव  नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पारित करण्यात आला,अशी माहिती त्यांनी दिली.

 अखिल भारतीय प्रतिनिधी सभा कर्णावती (अहमदाबाद, गुजरात)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल  भारतीय  प्रतिनिधी  सभा कर्णावती ( अहमदाबाद, गुजरात )  येथे दिनांक 11  ते 13 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.  रा. स्व. संघाचे पू. सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत आणि मा.सरकार्यवाह दत्तात्रेयजी  होसबाळे यांनी दीपप्रज्वलन आणि भारतमाता पूजन करून प्रतिनिधी सभेचा शुभारंभ केला. या सभेमध्ये  देशभरातून एकूण १२५२  सदस्य  उपस्थित होते. पहिल्या सत्रात कोरोना महामारी, प्राकृतिक आपत्ती,  दहशतवादी हल्ले,  सीमेवर झालेल्या चकमकीत आणि विभिन्न दुर्घटनांमध्ये दिवंगत सर्वांप्रती श्रद्धासुमन अर्पित करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर संघाच्या कार्यस्थितीचा अहवाल मांडण्यात आला. २०२१ मध्ये देशभरात ३४५६९  स्थानी ५५६५२  शाखा सक्रिय होत्या, तर मार्च २०२२ मध्ये  सद्यस्थितीत  ३८३९० स्थानी ६०९२९  शाखा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र  प्रांतात २४७  ठिकाणी दैनंदिन ६००  शाखा  तर आठवड्यातून एकदा चालणारे साप्ताहिक मिलन ५५० ठिकाणी सुरु आहेत. शाखांच्या एकूण संख्येत गतसालापेक्षा साधारणपणे ६० टक्के वाढ झाली आहे. या सभेत  पू.सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या  वर्षभरातील महत्त्वाच्या  प्रवासाची   संक्षिप्त माहिती देण्यात आली. तसेच  देशभरातील संघाच्या विविध आयाम व गतीविधींच्या मार्फत झालेल्या कार्याचा वृत्तांतही मांडण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील काही ठळक  वृत्तांत पुढीलप्रमाणे :-

▪️ सेवा विभाग – 

• प्रांतात एकूण १७ प्रकारची सेवाकार्ये सुरु आहेत. त्यात गेल्या वर्षात अडीच लाख नागरिकांपर्यंत मदत कार्य पोहोचले. समुपदेशनाचा उपयोग आणि गरज यांचे महत्त्व मानवी जीवनात अनन्य साधारण असल्याचे  त्यातून अधोरेखित झाले. ग्रामीण भागात शेतकरी, महिला तर शहरी भागात उद्योजक आणि कामगार यांच्यामध्ये ते प्रकर्षाने जाणवले.

• शिक्षण आरोग्य आणि स्वावलंबन  विषयात पुणे शहरासह  प्रांतातील ७ शासकीय जिल्ह्यात १४८१ नित्य सेवाकार्ये सुरु आहेत.  आर्थिक दुर्बल सेवावस्त्यांमध्ये  ६०० ई गुरुकुल सुरु आहेत. तर पुणे, नगर आणि सांगली जिल्ह्यात नि:शुल्क शैक्षणिक अभ्यासिका सुरु आहेत.

▪️ सामाजिक सद्भाव –

• विविध ज्ञाती संस्था कार्यालयांमध्ये ९० ठिकाणी  भारतमाता पूजन

• पुणे शहरात विविध ज्ञाती प्रमुखांसह गुरुद्वारांमध्ये दर्शन

 ▪️ कुटुंब प्रबोधन –

• जागतिक योग दिनानिमित्ताने ८३११४ कुटुंबात योगसप्ताह ( योगयुक्त, रोग मुक्त स्वस्थचित्त कुटुंब अभियान )

• विद्यार्थ्यांची जडणघडण या विषयावर झालेल्या शिक्षक सभांमध्ये ५ जिल्ह्यातील १३७८ शिक्षक सहभागी

▪️ पर्यावरण –

• पर्यावरणपूरक गणेशोत्सवात ६ जिल्ह्यातील ३७२७ कुटुंबांचा सहभाग

• ई कचरा आणि प्लास्टिक संकलन ३ जिल्ह्यातील ३८८ केंद्रांमध्ये जमा करण्यात आले.

• वृक्ष संवर्धन, जलसंरक्षण आणि हरितवारी प्रकल्प ४ जिल्ह्यात सुरु आहे.

• जलसंरक्षण अभियानांतर्गत रंकाळा तलाव, कोल्हापूर ) स्वच्छता पाय विहिर पुष्करिणी तलाव  स्वच्छता ( सोलापूर), कमलेश्वर कुंड स्वच्छता ( सिन्नर, नाशिक ), पाण्याची टाकी स्वच्छता ( घोरावडेश्वर, पुणे जिल्हा )आदि उपक्रम झाले.

• राष्ट्रीय शालेय पर्यावरण स्पर्धेत प्रांतातील २४१ शाळेतील १०९९ विध्यार्थ्यांचा सहभाग

▪️ प्रचार विभाग –

• नाशिक, कोल्हापूर आणि पुणे येथे लघुपट महोत्सव झाले. तसेच लघुपट निर्मितीसंबंधी ५  कार्यशाळा घेण्यात आल्या.

• ब्लॉगर्स आणि स्तंभलेखकांसाठी २ ऑनलाईन संमेलने झाली त्यात १४२ जणांचा सहभाग होता.

• भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त ( स्वराज्य ७५ ) प्रांतस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात नोंदणी केलेल्या १०५० पैकी २०० संस्थांचे ५५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वराज्य ७५ अंतर्गत विविध विषयांवरील १६ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

▪️धर्मजागरण समन्वय – 

• साधू स्वाध्याय संगम कार्यक्रमात ६० धर्माचार्य उपस्थित होते. विशेष उपस्थितांमध्ये अयोध्या श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज होते.

• प्रांतातील ६९५  संवेदनशील स्थानी ७८  धर्माचार्यांचा प्रवास झाला. त्यामध्ये प्रवचन, दिंडी यासह ‘हिंदू जागवा, हिंदू वाचवा, हिंदू वाढवा, हिंदू सांभाळा’ या च:तुसुत्रीचा प्रसार करण्यात आला.

▪️शारीरिक विभाग –

• दंड  प्रहार दिनानिमित्त प्रांतातील ७७१ शाखांमध्ये ३१८४८ स्वयंसेवकांनी  एकूण ३२,३७,७६५ प्रहार मारले. जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त केलेल्या ७५ कोटी सूर्यनमस्कार या संकल्पापैकी प्रांतात ३३७ स्थानी ५१३५ कुटुंबांनी ८,४३,२२६ सूर्यनमस्कार घातले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *