टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा

तंत्रज्ञान पुणे-मुंबई
Spread the love

पुणे: टॅलेंट स्प्रिंट, एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉर्मेशनल डीपटेक  कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज तिच्या महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे . संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या आणि सक्षम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार सुरू केलेल्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळेलेले आहे.

विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला विद्यार्थ्यांना उच्च-वाढीच्या तंत्रज्ञान करिअरसाठी तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सॉफ्टवेअर अभियंता बनण्यासाठी प्रथम वर्षातील २५० महिला विद्यार्थिनींचा शोध घेऊन त्यांना तयार करणे हे यावर्षी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम प्रत्येक निवडलेल्या विद्यार्थ्याला पूर्णतः अनुदानीत १००% शिकवणी शिष्यवृत्ती आणि १००,००० रुपये स्टायपेंड प्रदान करेल.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात पुरेशी विविधता, समानता आणि समावेशाचा अभाव, विशेषत: महिलांचे कमीप्रतिनिधित्व, ही आता मुख्य प्रवाहातील चिंतेची बाब आहे.  या समस्येचे निराकरण करण्यासाठी टॅलेंटस्प्रिंटने चार वर्षांपूर्वी महिूा अभियंता(वि) कार्यक्रमाची कल्पना केली. ५०० जागांसाठी ५५ हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्याने या कार्यक्रमाचे पूर्वीचे तीन गट अत्यंत यशस्वी झाले आहेत. विच्या माजी विद्यार्थ्यांनी ५० पेक्षा जास्त जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये १००% प्लेसमेंट्स प्राप्त केल्या आहेत, ज्यांचा सरासरी पगार बाजाराच्या सरासरीच्या तीन पट आहे आणि वार्षिक ५४ लाखांची सर्वाधिक भरपाई आहे. स्वत:चे जोगतिक करिअर करू इच्छिणाऱ्या तरूण महिला विद्यार्थ्यांसाठी वि कार्यक्रम एक प्रकारचेक परिवर्तनीय व्यासपीठ आहे

ह्य या दोन वर्षांचा सखोल सर्वसमावेक कार्यक्रमात टॅलेंटस्प्रिंटमधील उच्च दर्जाचे प्राध्यापक आणि उद्योग तज्ञांकडून शिकणे आणि गुगलमधील अभियंते आणि तंत्रज्ञान नेत्यांकडून मार्गदर्शन समाविष्ट आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी बी. टेक किंवा बी.ई करणारे, माहिती तंत्रज्ञान, सीएसईईईइ, गणित, उपयोजित गणित किंवा समतुल्य मध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे तसेच १०वी आणि १२वी मध्ये ७०टक्क्यां  पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी या कार्यक्रमासाठी पात्र आहेत. पात्र विद्यार्थ्यांसाठी अर्ज सध्या खुले आहेत. अर्ज कसा करायचा याबद्दलच्या अधिक माहितीसाठी  अर्जदार या कार्यक्रमाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.  https://we.talentsprint.com/

गुगलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिव वेंकटरामन म्हणाले, समान क्षेत्र निर्माण करण्यासाठी आणि वैश्विक पातळवीर समर्पक उपाय योजना करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे आहे. आधीच्या महिला गटाने मिळवलेल्या यशामुळे आम्हाला या कार्यक्रमाचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन मिळालेले आहे आणि हा कार्यक्रम पुढील स्तरावर वाढवण्यासाठी टॅलेंटस्प्रिंटला पाठिंबा देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

टॅलेंटस्प्रिंटचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतनू पॉल म्हणाले  गेल्या तीन वर्षांपासूद टॅलेंटस्प्रिंट कार्यक्रमात भक्कम वाढ होत आहे. आजच्या घडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर सुरू करणाऱ्या ५०० पेक्षा जास्त उत्साही महिला अभियांत्रिकी विद्यार्थिनींच्या या परिवर्तनीय प्रवासाचे साक्षीदार होताना आम्हालाच प्रोत्साहन मिळाल्यासारखे वाटत आहे.  गुगल बरोबरची आमची भागीदारी अधिक सखोल करण्यात आणि तंत्रज्ञान उद्योगातील अंतर भरून काढण्यात आम्हाला आनंद होत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *