नवाब मालिक यांचा डी गँगशी संबंध असेल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे :शरद पवार यांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे– जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण जर त्यांचा डी गँगशी संबंध असेल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असा गौप्यस्फोट करत मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी भजापच्या इशाऱ्यावरून कारवाई करते. असा आरोप मगील काही दिवसांपासून संजय राऊत सतत करत आहेत. महाविकास आघाडीनेही हीच भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुडाचे राजकारण सुरू आहे म्हणत भाजपवर टीका केली आहे. अशातच मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकारण तापलं आहे. यावर दोन्ही बाजुने आता जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप सुड्याच्या भावनेतून कारवाई करत आहे. असा आरोप महाविकास आघाडी करत आहे, तर नवाब मलिक दोषी नसतील तर त्यांनी कोर्टात जावं असे भाजप नेते सांगत आहेत.मात्र नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणारच, कारण जर मलिक डी गँगशी संबंध असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशी गंभीर शंका चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले,  १९९३ च्या बॉम्बस्फोटातील नरसिंह राव यांचा अहवाल अजून बाकी आहे. हा बाहेर आल्यास आज जे बोलत आहेत त्यांची बोलती बंद होईल. मात्र, जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल. तसेच महाविकास आघाडीच्या आरोपावर बोलताना, विरोधी पक्षांनी असचं म्हणायचं असतं, त्यांनी म्हटल्या बद्दल त्यांचं अंभिनंदन व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली तेव्हाही असेच आरोप झाले, मात्र कालांतराने हा आवाज क्षीण होत जातो, कोण देशमुख, कोण भुजबळ अशी चर्चा त्यांच्याच पक्षामध्ये सुरू होते. त्यामुळे अशा आरोपांमध्ये तथ्य नाही. देशात कायदे आहेत, न्यायव्यवस्था असताना भाजपच सत्तेचा दुरुपयोग करत आहे असे म्हणणे योग्य नाही. उलट राज्य सरकारच्या विरोधात आम्ही न्यायालयातूनच प्रत्येक निर्णय बदलला आहे. तसेच राज्यात सात मार्चनंतर मोठी कारवाई व १० मार्चनंतर राज्यात सत्तांतर होईल असा माझा अंदाज मी व्यक्त केला आहे. ते होईल का मला माहीत नाही, पण माझे अंदाज कधी चुकत नाहीत, असेही पाटील सांगितले.तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. तुम्ही गेल्या २७ महिन्यात एकही प्रकरण जिंकलेला नाहीत. ईडीच्या नोटीशीला घाबरता कशाला? असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार यांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न

शरद पवार यांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. कधी मराठा विरुद्ध इतर असा कधी विषय सुरू करतात. तर कधी अल्पसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक नसलेल्यांचा विषय सुरू करतात. हे त्याचे ५० वर्षाच राजकारण समाजाला माहिती आहे. मुस्लीम समाजामध्ये त्यांच्याबद्दल एखाद्या वेळेस बरे मत तयार होईल आणि त्यांनाही माहिती आहे मते मिळतील. पण बिगर मुस्लिम समाजाला माहिती आहे की त्यांना कोणी गंभीरतेने घेत नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मालिक यांनी राजीनामा द्यावा

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मलिक यांची देहबोली म्हणजे गिरा तो भी टांग उपर अशी आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा,ही महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला,एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला. एका नेत्याचं अनधिकृत रिसॉर्ट आहे,एका मंत्र्याला दोन पत्नी आहे,किती मोठी यादी आहे. हे काय चाललं आहे? सगळं कोलमडलं आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *