मी काही बोललो तर फोकस बदलतो – आदित्य ठाकरे


पुणे–मी काही बोललो तर बातम्या बदलतात, फोकस बदलतो त्यामुळे मी आज आणि उद्या राजकीय काही बोलणार नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आदित्य ठाकरे दोन दिवस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत पण आदित्य ठाकरे हे पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारला की ते काहीच बोलत नाहीत. त्यावर आज पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले तुम्ही काही राजकीय उत्तर द्या त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी काही बोललो तर बातम्या बदलतात फोकस बदलतो त्यामुळे मी आज आणि उद्या राजकीय काही बोलणार नाही.

दरम्यान, पुणे हे नेहमी सगळ्याच बाबतीत अग्रेसर राहिले आहे, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, पुणे नेहमी अग्रेसर राहिलं आहे. काल पुण्यात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पुण्यात मोटर रॅली काढण्यात आली, त्यावर ठाकरे म्हणाले, कालची रैली यशस्वी होती.

अधिक वाचा  उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुण्यात इंधन परिषद भरवली आहे. पर्यायी इंथान परिषद याचे महत्त्वाचे कारण गुंतवणूक आहे. • राज्यासाठी  ही महत्त्वाची गोष्ट आहे. असेआदित्य ठाकरे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love