पुण्यात कसा असेल विकेंड लॉकडाऊन?


पुणे- राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडून अनेक निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. सोमवार शुक्रवार हे निर्बंध लावण्यात आले असून दुपारी जमावबंदी आणि रात्री संचारबंदी तर शनिवार आणि रविवार ‘विकेंड लॉकडाऊन’चा Weekend lockdown निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रामाने उद्या आणि परवा (दि. १० व ११ एप्रिल) असे दोन दिवस पुण्यात हा लॉकडाऊन कसा असेल? काय सुरु राहणार? काय बंद राहणार? याबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लेखी आदेश काढले आहेत.

दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन असल्याने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस किराणा दुकाने, भाजीपाला विक्री ही सुद्धा बंद राहणार आहे. मात्र, सकाळी सहा ते ११ वाजेपर्यंत दुध विक्री सुरु राहणार असून दुध विक्रेत्यांना त्यातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने सुरु राहणार असून बाकी सर्व व्यवहार बंद राहतील. तसेच शहर बस वाहतूक सेवा ( पीएमपीएमएल बससेवा) ही आता आहे तशीच बंद राहणार असून फक्त सरकारी कर्मचार्यांसाठी ही सेवा काही प्रमाणात सुरु राहील. तर घरेलू कामगार महिला आणि मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला, परीक्षांना जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना  या लॉकडाऊनमधून सुट देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यातील लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक : जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहणार

पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पार्सलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पार्सल सेवा पुरविणाऱ्या झोमॅॅटो, स्वीगी यांसारख्या संस्थांना या लॉकडाऊनमध्ये मुभा देण्यात आली आहे.  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love