Hotel Cozy and Black Club were knocked down

#कल्याणीनगर ‘हीट अँड रन’प्रकरण : हॉटेल कोझी आणि ब्लॅक क्लबला ठोकले टाळे

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)–कल्याणीनगर येथील ‘हीट अँड रन’ प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी घेतली आणि पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक्साईज विभागाने कारवाई करत हॉटेल कोझी आणि ब्लॅक क्लबला टाळे ठोकले आहे.

डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होणार : कर भरला नसल्याने कारला अधिकृत क्रमांक नाही

गुन्ह्यातील महागडी पोर्श गाडी ही मुंबईतील डिलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता गाडी विशाल अगरवाल यांना दिली. त्यामुळे डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होणार असून त्याबाबतची  प्रक्रिया सुरु करण्यात आली  अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.

भोर म्हणाले, बांधकाम व्यवासायिक विशाल अगरवाल यांची संबधित आलिशान कार परराज्यातून पुण्यात आणली गेली आहे. त्याकरिता  तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन मार्चमध्ये कार आणली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांचा कर भरला नसल्याने या कारला अधिकृत क्रमांक मिळालेला नाही.  महाराष्ट्रात कार विक्री केली असती तर येथील डीलरकडून गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असते. मात्र, डिलकरडून तात्पुरते रजिस्ट्रेशन केले जात नाही. या घटनेत कार परराज्यातून आली आहे. त्यामुळे परराज्यातून गाडी येताना दुसऱ्या राज्यासाठी तेथील डीलर तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन देत असतो. या तात्पुरत्या रजिस्ट्रेशनवर विनाक्रमांक ही गाडी आपल्या राज्यात आणता येऊ शकते, परंतु रस्त्यावर चालवायची असेल तर ती तात्पुरती किंवा कायम स्वरुपी रजिस्ट्रेशन असल्याशिवाय ती घेऊन आणता येत नाही. कार मालकाने मार्चमध्ये रजिस्ट्रेशनचे पैसे भरले आहे. गाडी निरिक्षकाला दाखवली होती. मात्र, कारचा कर भरणे आवश्यक आहे. तो कर गाडी मालकाने भरला नाही. जोपर्यंत गाडी मालक गाडीचा कर भरत नाही तोपर्यंत त्याला आरटीओ कडून क्रमांक दिला जात नाही. बाहेरच्या राज्याने तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन दिले होते. यात मुंबईतील डीलरने गाडीचे बुकिंग घेतलेले आहे. या डीलरची गाडीचे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी होती. पण त्याने ते काम केले नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *