gtag('js', new Date());
मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा आरोपी गजाआड
पुणे(प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज व कॉल करून सतत त्रास देणाऱया आरोपीला पुण्यातील भोसरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपी हा मूळचा बीड जिल्हय़ातील परळीचा रहिवासी असल्याचीही माहिती समोर आली आहे. अमोल काळे, असे या आरोपीचे नाव आहे. पंकजा मुंडे यांना मागील काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरून अश्लील मेसेज व फोन येत होते. याबाबत...
Pune businessman brutally murdered in Bihar
पुणे(प्रतिनिधि)--पुणे शहरातील उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे (वय-५५, रा.डी.पी.रस्ता, कोथरुड,पुणे) यांना सायबर चोरटयांनी संपर्क साधून व्यवसायाच्या निमित्ताने झारखंड मधील एक मोठी ऑर्डर देतो, असा बहाणा करुन बिहार मधील पाटणा जवळ जहानबाद येथे बोलावले. त्यानंतर या उद्योजकाला शेतात नेऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी करुन, पैसे न दिल्याने निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत कोथरुड...
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आज रात्री राज्य शासनाला सादर केला जाणार
पुणे: तनिषा भिसे मृत्यूप्रकरणात आतापर्यंत राज्य आरोग्य विभाग, पुणे धर्मादाय आयुक्त आणि पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू विभागाचे आहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले आहेत. या सर्व आहवालात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबद्दल आणि डॉ. सुश्रृत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, दिनानाथ रुग्णालय स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, आता ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल आजच उशिरा राज्य शासनाला...
धायरीतील श्री ज्वेलर्सवर दरोडा
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी मंगळवारी संध्याकाळी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान असून दरोडोखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील २० ते २५ तोळे सोने लुटुन नेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तुल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून...
The government should take responsibility for minimum infrastructure facilities for the arts department.
पुणे- "कुठल्याही पायाभूत सुविधा नसतानाही, विद्यापीठ स्तरावर उत्तमोत्तम कलाकार घडवण्याचे कार्य विद्यापीठांतील कलाविभाग करत आहेत. अशा परिस्थितीत किमान शासकीय विद्यापीठांमध्ये तरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी", अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे माजी संचालक आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केली. 'विनोद हा सध्या गंभीर विषय झाला आहे. विनोदाने सध्या...
CQRA and CIDC
पुणे-भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर विकासाची गुणवत्ता उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कन्स्ट्रक्शन क्वालिटी रेटिंग एजन्सी (CQRA) ने कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल (CIDC) बरोबर भागीदारी करत भारताची पहिली गुणवत्ता मूल्यांकन व ग्रेडिंग प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली जागतिक दर्जा सुनिश्चित करण्यासाठी तसेच देशभरातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी नवीन मानदंड तयार करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे.ही ग्रेडिंग प्रणाली सर्व प्रमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांवर लागू...