gtag('js', new Date());
मुंबई— देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी दोन आठवड्याचा अवधी लागेल असा दावा आयआयटी, मुंबईच्या अहवालात करण्यात आला आहे. देशाची परिस्थितीही लवकरच बदलेल आणि महाराष्ट्रात कोरोनावर दोन महिन्यात नियंत्रण मिळवता येईल असेही या अहवालात म्हटले आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. भास्करन रमण यांनी कोरोनावरील नियंत्रणाबाबत हा अहवाल तयार केला आहे.
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—सर्व जगात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही विळखा अधिक घट्ट केला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 40 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची  संख्या 11 लाखांवर गेली आहे. लक्षद्वीप वगळता कोरोनाने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात प्रवेश केला आहे. काही राज्यांमध्ये सुरुवातीला नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. परंतु...
आज (20 जुलै) सोमवार श्रावण महिन्याची अमावास्या तिथी. सोमवारी ही अमावास्या आल्याने तिला  सोमवती अमावस्या म्हणतात. याशिवाय ती श्रावण महिन्यात आल्याने तिला ‘हरियाली अमावस्या’ असेही म्हटले जाते. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, दान आणि पूजा-पाठ याला महत्व आहे. श्रावण महिन्यात सोमवारी अमावस्या आल्याने तिचे महत्त्व अधिक...
ऑनलाईनटीम- अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु आहे. नेपोटिज्म सारख्या मुद्द्यांवरून दोन गट पडले असून त्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.  अभिनेत्री कंगना रनौतने तर या वादामध्ये उघडपणे भूमिका घेऊन उडी घेतली आहे. “बॉलीवूडमध्ये अशी एक टोळी आहे, जिच्या इशाऱ्यावर इथे सर्व काही चालते”,असा जाहीर आरोप तीने केला आहे. कंगनाच्या भूमिकेचे  आता...
नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर वाढली आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आता सहा कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2019 पर्यंत मोदींच्या फॉलोअर्सची  संख्या सुमारे पाच कोटी होती. मोदींनी आपले ट्विटर अकाउंट 2009 मध्ये सुरु केले होते.फॉलोअर्सच्या यादीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पीएम मोदी यांच्यानंतर भारतीय...
कोल्हापूर(ऑनलाईन टीम)—राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे तर यूजीसीने परीक्षा घ्याव्यात असे निर्देश दिले आहे. याबाबत उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे तर युवा सेनेने सर्वोच्च नायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. मुलांच्या पालकांनी चिंता...