gtag('js', new Date());
पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जन्मदात्या पित्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि गळा दाबून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी चिमुकलीची आई सोनम शक्तिमान काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे....
नागपूर--विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (मा. गो. वैद्य) यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा...
पुणे- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा ‘फेकुचंद; असा उल्लेख केल्याने दोघांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. पडळकर यांनी संजय राऊत याच्यावर पलटवार करत  खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु, ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही असे म्हटले आहे. तुमचा पगार किती?...
पुणे – ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंध वरुन जात होते. त्यावेळी...
पुणे- राज्य सरकारने लसीकरणाबाबत नियोजन केलेले आहे.  त्यात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे हे कौतुकास्पद आहेच परंतु त्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेने केली आहे.याबाबतचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज देण्यात आले.  दुर्गा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष...
पुणे- गेल्या आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम द्राक्ष शेतीवर झाला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांन दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यंदा द्राक्षाचे भरघोस उत्पादन होणार असून राज्यातून ४२ द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.ढगाळ वातावरणामुळे यंदा द्राक्ष उत्पादकांना फटका बसेल चिन्ह होती मात्र, त्याचा द्राक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं राज्य फलोत्पादन विभागानं...