gtag('js', new Date());
पुणे-पुण्यात मागील आठवडय़ात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्ग वाढत असला, तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी बुधवारी केले. दरम्यान, पुण्यात कोरोनाची दुसरी...
मुंबई- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास Maharashtra State Skills University व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे. त्यामधील सार्वजनिक कौशल्य  विद्यापीठे  राजस्थान, हरियाणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे स्थापन झाले आहे. आंध्रप्रदेशमध्ये...
मुंबई -पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या धोरणात...
चेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी गाजत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि त्यावरून...
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सादर केलेला पर्यावरण सद्यस्थिती अहवाल  (सन 2019-2020) कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे काही नसून हा फक्त सादर करायचा आहे म्हणून सादर केलेला अहवाल आहे.दरवर्षी एकाच संस्थेकडून अहवाल बनवला जातो.त्यामुळे कट, कॉपी, पेस्टच्या पलिकडे या पर्यावरण अहवालात काही नाही असा आरोप करत रयत विद्यार्थी परिषदेने या पर्यावरण अहवालाची होळी केली.
औरंगाबाद: केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MSME Board वर महाराष्ट्रातून प्रसिध्द उदयोजक रवीन्द्र वैद्य (औरंगाबाद) व स्मिता घैसास (पुणे)यांची नियुक्ति करण्यात आली आहे. रवीन्द्र वैद्य हे श्री गणेश प्रेस एंड कोट प्रा.लीचे व्यवस्थापकीय संचालक  तर स्मिता घैसास या मे.मिनीलेक ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. उदयोगक्षेत्रात दोघांचेही विशेष नाव असून अनेक सामाजिक संघटनेत योगदानही...