gtag('js', new Date());
पुणे-देशभरामध्ये विविध उद्योग,व्यवसायात पाच हजार दलित महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी आज महिला दिनानिमित्त व्यक्त केला.राष्ट्रीय एस.एसी हब व डिक्कीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित उद्योजक (व्हेडर) विकास कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील विविधी  उदयोग क्षेत्रातील यशस्वी...
पुणे- जेनेरीक औषधे स्वस्त असतात आणि त्यामुळे खूप बचत होते असे सांगत जेथे ठराविक औषधांची गरज असते, असे दुर्धर आजार वगळता डॉक्टरांनी जेनेरिक औषधे द्यावीत, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.  जनौषधी दिवसानिमित्त, जावडेकर यांनी पुणे येथील कोथरूड डी. पी रोड स्थित सखाई प्लाझा हेल्थ पॉईंट...
पुणे—पुण्यातील कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला करून बनावट एटीएम कार्डद्वारे 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी सुमेर शेख (वय 28) या दुबईस्थित आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुमेरच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर हल्ल्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा केला जात आहे.
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू...
पुणे—पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात असलेल्या ओशो आश्रमावरही कोरोनाच्या संकटामुळे भूखंड विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, विकण्यासाठी काढलेल्या दोन भूखंडाला एकशे सात कोटी रुपयांची बोली एका प्रथितयश उद्योगपतीने लावली असल्याच्या चर्चेला उधाण आले असून एवढ्या मोठ्या बोलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र...
पुणे—पुण्यातील वानवडी भागात घडलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी भाजपने महविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राठोड यांना राजीनामा द्यावा लागला....