पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संकटाला प्रतिबंध कण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत सात दिवस संचारबंदीसह, शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती...
शिक्षण
पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेआधी होणार सराव परीक्षा:विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचे तंत्र समजावून घेता येणार
News24Pune -
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा या १० एप्रिलपासून सुरु होणार असल्या तरीही त्याबाबतची सराव परीक्षा मात्र ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात...
पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला असला तरी, राज्यातील एकूण कोरोना स्थितीचा आढावा घेण्य़ासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यात राज्यात लॉकडाऊन केला जाणार की निर्बंध कडक केले जाणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दिल्लीतही आज एक महत्वाची...
पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी अंशत: लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवस संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली...
पुणे – महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरील महिला अत्याचारच्या आरोपांवरून अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणीत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर बंदुकीचा धाक आणि लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप परभणीच्या एका शिक्षक महिलेने केला आहे.गेल्या वर्षभरापासून या अत्याचाराविरोधात पोलीस स्टेशनला...
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे प्रवेश पत्र येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेता येणार आहे.इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार...














