gtag('js', new Date());
पुणे-राज्यात सत्तेत येण्याकरिता भाजपला कोणत्याही पक्षाची कुबडी नको आहे. यापुढील काळात पूर्ण स्वबळावर भाजप निवडणुक लढवेल आणि एकट्याच्या ताकदीवर राज्यात सत्ता आणेल असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला.भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले,...
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. आज (शनिवारी) नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. आज दिवसभरात नवीन ५७२० पाॅॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.पुणे शहरात आणि जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ ही आता पुणेकरांच्या दृष्टीने भयावह वाटायला लागली आहे....
पुणे- पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. सरग यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मागील आठवड्यात लक्षणे दिसू लागल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावतच...
पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी शोधलेले औषध हे कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या औषधाबाबत गेल्या वर्षभरापासून आयुष मंत्रालयाशी संपर्क साधत असून त्यांना या औषधाची दाखल घेण्याची विनंती केली असल्याचे डॉ. फडके यांनी म्हटले आहे.
पुणे -काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे मनपा वृक्ष समितीचे माजी सदस्य एडविन रॉबर्ट्स (वय 68) यांचे आज सकाळी नोबल हॉस्पिटल येथे करोनामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.काँग्रेस पक्षात ते अतिशय सक्रिय होते. तसेच सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुका...
पुणे—पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा (पीएमपीएमएल बससेवा) सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपने विरोध केला असून आज पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी...