gtag('js', new Date());
भारतीय शेअर बाजार घसरण आणि जागतिक तणाव
जागतिक पातळीवरील वाढत्या तणावाचा आणि आर्थिक अनिश्चिततेचा मोठा फटका आज भारतीय शेअर बाजारासह जगभरातील बाजारपेठांना बसला आहे. देशांतर्गत बाजारात प्रचंड विक्रीच्या दबावामुळे निफ्टीने २४,००० ची महत्त्वाची आणि अत्यंत नाजूक पातळी तोडली असून बाजार या पातळीच्या खाली बंद झाला आहे. बाजारात आधीच इंडेक्स पातळीवर मोठ्या प्रमाणावर शॉर्ट पोझिशन्स तयार होत्या, ज्यांमुळे २४,००० ची ही पातळी अत्यंत नाजूक बनली होती; त्यातच...
पुणे(प्रतिनिधी)— "केंद्र आणि राज्य सरकार साखर कारखानदारीतून दरवर्षी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा प्रचंड महसूल गोळा करते, मग हीच कारखानदारी संकटात असताना सरकार तिचा हात का सोडून देत आहे?" असा रोखठोक सवाल राज्याचे माजी कृषिमंत्री व कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. पुण्यात 'जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन'च्या वतीने आयोजित सहकार पुरस्कार सोहळ्यात माजी मंत्री दिलीप देशमुख यांना केंद्रीय सहकार राज्यमंत्री...
मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन
पुणे(प्रतिनिधी)--मराठा समाजाला ‘मराठा’ म्हणून मिळालेले SEBC आरक्षण टिकवावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा प्रलंबित व्याज परतावा तातडीने एकरकमी द्यावा, तसेच कमी शुल्काच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना जात प्रमाणपत्र पडताळणीतून वगळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे भेट घेऊन देण्यात आले.यावेळी मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री...
मराठा आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे बॅनरबाजी
पुणे(प्रतिनिधी)- पुण्यात सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याच्या मार्गावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक बॅनरबाजी केली. मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने या बॅनरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबत जाब विचारण्यात आला. "कुणबी नोंद नसलेल्या मराठ्यांच्या...
अमित ठाकरे शासकीय तंत्रनिकेतन गुन्हा अभिमान
पुणे(प्रतिनिधी)--पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आंदोलनानंतर आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेतली आहे. "माझ्यावर याआधी नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी गुन्हा दाखल झाला होता आणि हा दुसरा गुन्हासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठीच दाखल झाला आहे; त्यामुळे मला या दोन्ही गुन्ह्यांचा सार्थ अभिमान आहे," असे प्रतिपादन अमित ठाकरे...
देवेंद्र फडणवीस काँग्रेस लाल संविधान टीका
पुणे(प्रतिनिधी)--काँग्रेस पक्षाने भूतकाळात आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड करून मूलभूत अधिकार संपवले होते, आणि आज तोच काँग्रेस पक्ष 'लाल संविधान' हातात घेऊन राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. हे लाल संविधान जरी बाहेरून संविधानाचे कव्हर असलेले दिसत असले, तरी त्याच्या आतमध्ये माओवादाचे लाल पुस्तक दडलेले असून, त्याच विचारसरणीच्या आधारावर सध्याची त्यांची कारवाई सुरू आहे....