रविराज साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी फेरनिवड

रविराज साबळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष
रविराज साबळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष

पिंपरी(प्रतिनिधी)– आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी रविराज साबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तशी घोषणा संघटनेच्या व्हिजीलन्स सेलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शरत शेट्टी केली.

रविराज साबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मानवाधिकार रक्षण, समाजसेवा आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवाधिकारांची जाणीव पोहोचवणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे, याला ते प्राधान्य देत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत गरीब, गरजू रुग्णांची सोळा कोटी रुपयांहून अधिक बिले माफ करण्यासाठी विविध रुग्णालयांमध्ये पाठपुरावा करून रुग्णांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.

आजपर्यंत त्यांनी फासा विद्यार्थी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष, वंदे मातरम् संघटना पिं. चिं. शहर जिल्हाप्रमुख तसेच अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं. चिं. शहर उपाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पिं. चिं. शहर सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पर्यावरण विभाग) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच भंडारा जिल्हा प्रभारी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी कार्यरत असताना, त्यांनी महाराष्ट्रात वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमधील गरीब रुग्णांची १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त बिले माफ करण्यासाठी पुढाकार घेतला.

अधिक वाचा  Atalparva | Kalasangam:कलासंगमातून उलगडले ‘अटल’ जीवनपैलू : विविध कलाविष्कारातून अटल बिहारी वाजपेयींना अभिनादन

विविध विषयांवरील चर्चासत्रे, माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती, मतदान जनजागृती, समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या १३ हजारांहून अधिक समस्या यशस्वीरित्या सोडवण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून पिंपरी चिंचवड, पुण्यासहीत, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गरीब व गरजू लोकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला केंद्र सुरू करण्यात आले.

ऑक्टोबर २०२१ पासून ग्रामीण व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकिंग मोफत प्रशिक्षणाची सुरुवात केली. यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयीची भीती कमी होण्यास मदत होत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन विविध संस्था, संघटनांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे.

अधिक वाचा  पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू; पोलिसांची मोठी कारवाई, ८ जण गजाआड

संपूर्ण महाराष्ट्रात संघटन अधिक मजबूत, सक्रिय आणि पारदर्शक बनवण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. बंधुता, समता आणि न्यायाच्या तत्त्वांवर चालून मानवतेची सेवा अधिक गतिमान करण्याला माझे प्राधान्य असणार आहे.

       – रविराज साबळे, नूतन अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love