gtag('js', new Date());
पुणे-- पायी वारीवर ठाम असलेल्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन  पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने आणि स्थानिक आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्तीने बंडातात्या यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानानंतर ते पोलिसांच्या गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले.  
पुणे -मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ - मृदुंगाच्या गजरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे शुक्रवारी (दि.२ ) रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती असल्याने मंदिर परिसर मोकळा मोकळा दिसून येत होता. तरी उपस्थित वारक-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता .माऊलीच्या समाधी...
पुणे -ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांचे 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते' चे हे पुस्तक म्हणजे जनतेला, राजकीय नेत्यांना, राजकीय सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवजच असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांच्या 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते' चे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात ...
पुणे--जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता   मर्यादित नाही. याबाबत गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार असून  लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने...
पुणे- सातारा जरंडेश्वर कारखान्याची विक्री ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली होती, त्यामध्ये कारखान्यातील संचालक मंडळाचा कोणताही हात नव्हता असं स्पष्ट करत ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, अनेक कामगारांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे....
पुणे - मराठा आरक्षणाबाबत १०२ वी घटनादुरूस्तीनुसार राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी पुनर्विचार याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दुर्दैवाने ती काल फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे आता पुनर्विचार याचिकेचा विषयच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय...