gtag('js', new Date());
५० घरफोड्या करणाऱ्या बांगलादेशी चोराला पुण्याच्या अलंकार पोलिसांकडून वाराणसीत बेड्या
पुणे(प्रतिनिधी)--देशातील विविध राज्यांमध्ये ५० हून अधिक घरफोड्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका ३८ वर्षीय बांगलादेशी नागरिकाला पुण्याच्या अलंकार पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. एका हायटेक पाठलागानंतर पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि परकीय चलन हस्तगत करण्यात आले आहे.या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या कर्वेनगर भागातील 'द टेरिटरी' नावाच्या कार्यालयात...
सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या
पुणे(प्रतिनिधी)--पुण्यातील कात्रज परिसरात एका २० वर्षीय तरुणाने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद साद आसिफ सय्यद असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्यासह एकूण सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ मार्च...
स्वतःला महादेवाचा अवतार सांगणाऱ्या ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदू बाबाला अटक
पुणे(प्रतिनिधी)--स्वतःला भगवान महादेवाचा अवतार सांगून एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून अटक केली असून, न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, पुण्यात समोर आलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची सुरुवात २०२३ मध्ये झाली, जेव्हा पीडित महिला आणि आरोपी ऋषिकेश वैद्य यांची...
विराट हिंदू संमेलन कोथरूड
पुणे((प्रतिनिधी)— रामनवमीच्या निमित्ताने कोथरूड येथील जीत मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाला श्रोत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुडुंब भरलेल्या मैदानात आणि सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.या संमेलनात वक्ते गणेश शिंदे यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी शैलीत निसर्ग, समाज आणि अर्थकारण या विविध विषयांना स्पर्श करत श्रोत्यांना भावनिक साद घातली. ऐतिहासिक दाखले देत त्यांनी सद्य परिस्थितीची सांगड घालत विचार मांडले. “आज...
Maharashtra Sahitya Parishad election
पुणे(प्रतिनिधी)--साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल झाला. सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलला पराभवाची धूळ चारत साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परिषदेच्या प्रमुख पदांवर विजय मिळवला. एकूण ३१ जागांपैकी २४ जागा विद्यमान सदस्यांना मिळाल्या. तर ७ जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण विजयी झाले. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक तर कोषाध्यक्ष पदी प्रदीप...
इराण-अमेरिका संघर्ष आणि भारताचा सुरक्षित मार्ग
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष एका अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर येऊन ठेपला आहे. एकेकाळी जगावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारी 'सुपर पॉवर' अमेरिका आज स्वतःच्याच विसंगत धोरणांच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. या संघर्षाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेने इराणच्या सामर्थ्याचा केलेला चुकीचा अंदाज आणि त्यातून निर्माण झालेली जागतिक तेलाची कोंडी. याउलट, भारताने मात्र आपल्या प्रगल्भ मुत्सद्देगिरीच्या...