gtag('js', new Date());
नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील अनिल नरसीपुरम आणि श्रुती नायर या दाम्पत्याने ब्लॉकचेन लग्न केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ साठीच्या अर्थसंकल्पात डिजिटल मालमत्ता आणि त्यांचे व्यवहार यांचा उल्लेख केला. डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारात प्राप्तकर्त्यावर ३०% कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे अप्रत्यक्षरीत्या डिजिटल मालमत्तांना मान्यता देण्यासारखेच आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर मध्ये झालेले हे...
पुणे--अनैतिक संबंधाला नकार देणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये टाकून फरार झाला आहे. पोलिसांनी गुलाम मोहम्मद शेख (वय ३०  रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी  दिलेल्या...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे--देशातील सुख-सुविधा_संपत्ती व पायाभूत सुविधा ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’ मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे.स्व-कर्तुत्वाने ‘देशाचा विकास दर व दरडोई...
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे सादर केली आहेत त्या विद्यार्थ्यांना युजर आयडी व पासवर्ड हे...
पुणे--पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले.पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी...
पुणे-चित्रपट, टेलिव्हिजन, जाहिरात,जनसंपर्क आणि इव्हेंट अशा माध्यम क्षेत्राशी निगडित उद्योजक आणि या क्षेत्रात काम करू इच्छीणारे सर्जनशील व्यक्ती यांना एकत्र आणत त्यांच्यातील दरी साधण्यासाठी पुण्यातील 'कास्ट इंडिया' हे स्टार्टअप सज्ज झाले आहे.या व्यासपीठाच्या माध्यमातून हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले जाण्यास मोठी मदत होणार आहे. हे एक बहुउद्देशीय व्यासपीठ आहे, ज्यामुळे माध्यम...