चिखली / छ. संभाजी नगर - महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) बट्ट्याबोळ केला. त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न डॅमेज करण्यात आला. आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांनी केली.
क्राईम
युवकाच्या मृत्यूस जबाबदार तपास अधिकारी व मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी
News24Pune -
पुणे : अकोट (जि. अकोला) शिवराज गावंडे(Shivraj Gavande) याच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याने मुलाने आत्महत्या (Sucide) केल्याच्या आरोप त्याच्या आईने केला आहे. युवकावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर तसेच पोलिसांना या प्रकरणात मदत करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे (Sharad Sports and Cultural Foundation) संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया...
पुणे- ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था सातारा रनर्स फाऊंडेशनद्वारे आयोजित केली जाणारी बहुप्रतिक्षित जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन (एसएचएचएम) चे १२ वे पर्व ३ सप्टेंबर २०२३ रोजी देशभरातील रनिंग उत्साहींना एकत्र आणण्यास सज्ज आहे. ७,५०० नोंदणींच्या विक्रमासह ही भारतातील तिसरी सर्वात मोठी हाफ मॅरेथॉन इव्हेण्ट आहे आणि देशातील सर्वात खडतर मॅरेथॉन मानली जाते. यंदाच्या मॅरेथॉनसाठी थीम आहे...
श्री रविकुमार (श्रीशैलम) हैदराबाद /अरुण अमृतवाड पुणे- श्रीशैलम क्षेत्र येथील अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा अन्नछत्रम नित्यानदान सतरामच्या प्रांगणात ७७ वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करण्यात आला. धर्मशाळेचे अध्यक्ष वर्कला सूर्यनारायण यांच्या हस्ते व अखिल भारत पद्मशाळी धर्मशाळा श्रीक्षेत्र पंढरपूरचे कार्यकारणी सदस्य अरुण अमृतवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एस. आर, ट्रॅव्हल्स दिव्यश यात्राचे श्री.नागार्जुन चिलवेरी...
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याचा दावा भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. (Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune?)मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून...
पुणे(अरुण अमृतवाड) – नारळी पौर्णिमेच्या दिवशी पद्मशाली समाजाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा पारंपारिक महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव यंदाही नारळी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील भवानी पेठ व गंज पेठ येथून पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य रथयात्रा काढण्यात आली. पद्मशाली समाज या रथ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














