ब्रिकईटीसीचा पुण्यातील जेएसपीएम आणि टीएसएसएमम शाळांसोबत सामंजस्य करार

BrickETC MoU with JSPM and TSSM schools in Pune
BrickETC MoU with JSPM and TSSM schools in Pune

पुणे :  ऑनलाइन व्यावसायिक आणि कौशल्य अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी प्रदान करण्यासाठी समर्पित अग्रगण्य एड-टेक प्लॅटफॉर्म असलेल्या ब्रिकईटीसीला जेएसपीएम आणि टीएसएसएममसोबत एका महत्त्वपूर्ण सहकार्याची घोषणा करताना आनंद होत आहे. ब्रिकईटीसी आणि या नामांकित शैक्षणिक संस्थांमधील सामंजस्य करारात सहा शाळांचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे ८,००० विद्यार्थ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना करिअरच्या माहितीपूर्ण निवडी करण्यास, आवडीनिवडींचा पाठपुरावा करण्यास आणि कौशल्ये मिळवण्यास समर्थ बनविणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे.

जेएसपीएम शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद करताना असे आढळून आले की त्यांच्यापैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त जणांना भविष्यात व्यवसायाचे मालक किंवा उद्योजक बनण्याची आकांक्षा आहे. या शाळांमध्ये असाधारण शिक्षण उपलब्ध आहे, तसेच या आकांक्षांना वास्तवात आणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन प्रदान करण्याची विशेष क्षमता ब्रिकईटीसीच्या कार्यक्रमात आहे. आजच्या ‘जनरेशन अल्फा’ विद्यार्थ्यांना सध्याच्या करिअर ट्रेंडची असामान्य माहिती आहे. मात्र  स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत आपल्या क्षमतेचे रूपांतर यशामध्ये करण्यासाठी योग्य मार्ग आणि मार्गदर्शनाचा त्यांच्याकडे अभाव आहे.

अधिक वाचा  1977 पासून पवारांचा विलीनीकरणाचा इतिहास - चंद्रशेखर बावनकुळे

ब्रिकईटीसीच्या संस्थापिका आणि एसएमईएफच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संस्थांपिका संचालिका डॉ. पूजा मिसाळ आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सजगपणे करिअर निवडण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. त्या आवर्जून सांगतात, “पूर्णवेळ कार्यक्रमात समाविष्ट होण्यापूर्वी अभ्यासक्रमांचा अनुभव घेणे हा पर्याय पूर्वी कधीही उपलब्ध नव्हता. ब्रिकईटीसीत या विद्यार्थ्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवर आकर्षक अभ्यासक्रम शोधताना पाहताना आम्हाला  उत्सुकता वाटते. जेएसपीएम आणि  टीएसएसएमम शाळांचे व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी त्यांच्या  विद्यार्थ्यांची ही गरज ओळखली आहे आणि ही दरी भरून काढण्यासाठी त्यांना आवडीनिवडीपासून ते करिअर घडविण्याचे मार्गदर्शन करताना आम्हाला आनंद होतो. आम्ही आणखी शाळांसोबत सहकार्य करण्याची आतुरतेने अपेक्षा करत आहोत.”

विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडींसाठी मार्गदर्शन करण्यात करिअर समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे असते. ब्रिकईटीसी च्या सर्वेक्षणानुसार, फक्त १० टक्के विद्यार्थ्यांना याची जाणीव असते, तर ४० टक्य्यांपेक्षा जास्त विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी गुगलवर अवलंबून आहेत. याशिवाय ३५ टक्के विद्यार्थ्यांना वाटते, की विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधणे हे त्यांना चांगले करिअर करण्यात मदत  करू शकते. एखादा अभ्यासक्रम किंवा क्षेत्र हे करिअर म्हणून पाठपुरावा करण्यापूर्वी ते अजमावून पाहणे, हे ८१ टक्के विद्यार्थ्यांसाठी योग्य असते. ही भूमिका ब्रिकईटीसीचे अभ्यासक्रम योग्यरित्या पार पाडतात. आपल्या आवडीनिवडीचे अनुसरण करणे हे अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या युगात ७० टक्के  विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की त्यांचे भविष्यातील करिअर हे त्यांच्या आवडीनिवडीवर निश्चित होते.मात्र करिअर म्हणून त्यांच्या आवडीनिवडीचा टिकाऊपणा आणि व्यवहार्यता हे कळीचे प्रश्न ठरतात आणि ब्रिकईटीसीचे अभ्यासक्रम या प्रश्नांची उत्तरे देतात.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love