ड्रीम ११ चा जुगार खेळून रातोरात करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे निलंबन

Overnight millionaire PSI Somnath Zende suspended for gambling on Dream 11
Overnight millionaire PSI Somnath Zende suspended for gambling on Dream 11

पुणे-ड्रीम ११ खेळून रातोरात करोडपती झाल्याने चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे (Somnath Shinde) यांना खात्यांतर्गत चौकशीनंतर निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रीम ११ चा जुगार खेळणे झेंडे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. (Overnight millionaire PSI Somnath Zende suspended for gambling on Dream 11)

क्रिकेट वर्ल्ड कपचा फिवर सुरू असताना पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम ११ या ऑनलाइन जुगार खेळात  दीड कोटी रुपयांची लॉटरी लागली. मात्र, यामुळे ते वादात सापडले आहेत.  सोमनाथ झेंडे यांनी ऑनलाइन जुगाराला प्राधान्य दिले. तसेच कामावर असताना त्यांनी ऑनलाईन गेम खेळून पैसे जिंकले. शिवाय यानंतर त्यांनी याचा गाजावाजा करत  गणवेशात माध्यमांना वेळोवेळी मुलाखती दिल्या. हीच चूक त्यांना भोवली आहे.  यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात असताना निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा आनंद मावळला आहे.

अधिक वाचा  #Gita Bhakti Amrit-Mahotsava : परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी जी महाराज यांच्या ७५ वर्ष पूर्तीनिमित्त आळंदी येथे विशाल गीताभक्ति अमृत-महोत्सवाचे आयोजन

सोमनाथ झेंडे यांनी कामावर असतांना त्यांनी ऑनलिन बॅटिंग गेम असलेल्या ड्रीम ११ हा गेम वारंवार खेळला.  बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनवर त्यांची टीम तयार होती.आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात स्वतःची टीम तयार करत दीड कोटी रुपये त्यांनी जिंकले होते. दरम्यान, त्यांनी ऑनलाइन गेमचे उदात्तीकरण केले. तसेच गणवेशवर प्रसारमाध्यमांना मुलाखती देखील दिल्या होत्या. यामुळे  त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांनी  पोलिसांच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. झेंडे यांना त्यांची बाजू मांडण्याचीदेखील  विभागीय चौकशीत त्यांना  संधी दिली जाणार आहे.  तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे असताना झेंडे यांनी मुलाखती देऊन या गेमचे उदात्तीकरण केले. पोलिस असून सुद्धा त्यांनी समाजात चुकीचा संदेश दिला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love