Global showroom count of Malabar Gold & Diamonds at 333

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या जागतिक शोरूमची संख्या ३३३ वर

पुणे-मुंबई
Spread the love

मुंबई : जगातील आघाडीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यापैकी एक मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने दिल्लीतील राजौरी गार्डन, हरियाणातील अंबाला, गुजरातमधील भावनगर आणि मध्य प्रदेशमध्ये जबलपूर असे एकाच वेळी चार शोरूम सुरू केले असून, त्यायोगे त्यांच्या जागतिक शोरूमची संख्या ३३३ वर पोहोचली आहे.

मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे भारतीय परिचालनाचे व्यवस्थापकीय संचालक आशेर ओ., मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या आंतरराष्ट्रीय परिचालनाचे व्यवस्थापकीय संचालक शामलाल अहमद, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे समूह कार्यकारी संचालक ए.के. निषाद, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे विक्री परिचालन विभागाचे प्रमुख (उर्वरित भारत) पी.के. सिराज यांच्यासमवेत इतर संचालक आणि उच्च व्यवस्थापन संघ यांनी दूरदृकश्राव्य माध्यमातून या दालनांचे उद्घाटन केले.

भारतातील किरकोळ विस्ताराच्या या नवीनतम टप्प्यानंतर, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे आता दिल्लीत ११ शोरूम, हरियाणामध्ये ५ शोरूम, गुजरातमध्ये ७ शोरूम आणि मध्य प्रदेशमध्ये ४ शोरूम कार्यान्वित झाले आहेत.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे लक्ष्य आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जागतिक शोरूमची संख्या ३६५ पर्यंत वाढवण्याचे आहे. समूहाची ११ देशांमध्ये किरकोळ विक्री दालने कार्यरत असून, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये समूह शोरूम उघडण्याच्या प्रक्रियेत आहे.

चार शोरूमच्या एकाचवेळी अनावरणावर भाष्य करताना मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले,जागतिक शोरूमची संख्या ३३३ पर्यंत वाढवणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आमच्या आभूषण रचनेचे अष्टपैलुत्व हे विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या संवेदनशीलतेला अनुरूप तसेच गुणवत्ता, पारदर्शकता आणि  ग्राहकांना उच्च दर्जाच्या सेवा प्रस्तुत करण्याची वचनबद्धता पूर्ण करते. या वैशिष्ट्यांमुळेच आम्हाला भारतातील आणि बाहेरील दागिने खरेदीदारांमध्ये सर्वात पसंतीची सराफ पेढी बनविले आहे. आमच्या ३० व्या वर्धापनदिनाचा एक भाग म्हणून, आम्ही अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची उपस्थिती आणखी वाढवत आहोत. आम्ही आमचे मौल्यवान ग्राहक, गुंतवणूकदार आणि आमच्या कर्मचार्‍यांचे सतत समर्थन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *