कला-संस्कृती
जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कवितांनी रंगला ‘आयुष्यावर बोलु काही’: डॉ. सलील कुलकर्णी यांचा कोथरूड गणेश फेस्टिवलमध्ये विशेष सन्मान
News24Pune -0
पुणे- आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कविता, प्रेम कविता, बालगीते सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमनाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (sandip Khare) आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी ‘आयुष्यावर बोलु काही’ (Ayushyavar Bolu Kahi) हा बहारदार कार्यक्रम कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सादर केला. (Special honor...
पुणे-लय, दिलखेचक अदाकारी, ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले, ठसकेबाज लावण्या त्याला प्रेक्षकांनी शिट्या वाजवून आणि नाचून दिलेला प्रतिसाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा खणखणाट व घुंगरांचा छनछनाट हा लावणी कार्यक्रम रंगला. ३५ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत कविता प्रॉडक्शन पुणे प्रस्तुत पप्पू बंड निर्मित लावणीचा खणखणाट व घुंगरांचा छनछनाट सह ऑर्केस्ट्रा...
३५ व्या पुणे फेस्टिव्हलमधील महिला महोत्सव अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाल्या.यास्पर्धेत एकल गटात १८ ते ३५ वर्षे वयोगटात स्नेहल साधू(प्रथम क्रमांक) अवंती जोशी (द्वितीय क्रमांक) शुभांगी फंड (तृतीय क्रमांक) एकल गटात ३६ ते ५० वर्षे वयोगटात पल्लवी लोंढे (प्रथम क्रमांक) निवेदिता बडवे(द्वितीय क्रमांक), सुप्रिया संत (तृतीय क्रमांक)समूह नृत्य स्पर्धेत भावना डान्स ग्रुप...
पुणे- ३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या 'व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिवल' स्पर्धेत सुझी मॅथ्यू सर्वोत्कृष्ट गायिका व करणसिंह चौहाण सर्वोत्कृष्ट गायक ठरले. तसेच पुणे फेस्टिवल फिरता करंडक' डॉ. डी वाय पाटील, एसीएस कॉलेज यांनी पटकावला. कॉलेजतर्फे संगीत विभागाच्या प्रमुख प्रा. अनिता सुळे आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या जल्लोषात हा करंडक स्विकारला.३५...
पुणे - विनोदी कविता, राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या, त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला लावणारे सध्याच्या राजकारणातील वास्तव, सामान्य माणसांच्या मनातील खदखदनाऱ्या प्रश्नांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत केलेले सूत्रसंचालन यामुळे ३५व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे हास्यधारा हे मराठी कविसंमेलन गाजले.
पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळून देणाऱ्या महिला महोत्सवात महिलांचा पाककला स्पर्धा, दि. २५ सप्टे. रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, शिवाजी नगर येथे उत्साहात पार पडल्या. महिलांच्या पाककला स्पर्धेचा यंदा २६वे वर्ष होते. दीपप्रज्वलनाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. पाककला स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता....














