राज्याचे सोशल फ्रॅब्रिक राखण्याची जबाबदारी सर्वांचीच – देवेंद्र फडणवीस

Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole
Fadnavis' direct challenge to Pawar, Thackeray and Patole

पुणे- मराठा (Maratha) व ओबीसी (obc) अशा दोन्ही समाजांना न्याय देण्याचा राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे. तथापि, महाराष्ट्राचे सोशल प्रॅब्रिक (Social Fabric) ब्रेक होणार नाही, याची खबरदारी राजकीय तसेच समाजाच्या नेत्यांचीही घेतली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गुरुवारी येथे दिला. (It is everyone’s responsibility to maintain the social fabric of the state)

पुण्यात (Pune) आले असता ते माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे, की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे. ती आमची भूमिका आहे. त्याच्यावर जी काही कार्यवाही करायची आहे, ती आम्ही सुरू केलेली आहे. त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल, तो वेळ आम्ही देऊ. याशिवाय ओबीसी समाजालादेखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेवटी राज्यकर्ते म्हणून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कुठेही दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्राचे सोशल प्रॅब्रिक ब्रेक होणार नाही, हा प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे. ही केवळ आमची नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीची, नेत्याची जबाबदारी आहे. राजकीय असो वा समाजाचे नेते असोत. प्रत्येकाला महाराष्ट्राचे सोशल प्रॅब्रिक डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. तशा प्रकारची विधाने वा वर्तनाबाबत प्रत्येकालाच काळजी घ्यावी लागेल. 

अधिक वाचा  स्वराज्यजननी जिजामाता!

ललित पाटील प्रकरणाबाबतच्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या आहेत आणि त्याला कुणी प्रोटेक्शन दिले, हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यासंदर्भात आता त्यांना बोलायलाच जागा राहिलेली नाही. त्यांनी वा अन्य कुणीही याबाबत कोणतीही तक्रार केली असेल, व्हिडिओ ट्विट केला असेल, तर त्याची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल. याबाबत अनेकांची तोंडे तर बंद झालीच आहेत, उरलेलीही लवकरच बंद होतील. या प्रकरणात थोडी अजून वाट बघा. यात वरवरची कारवाई करून फायदा नाही. अशा प्रकारचे रॅकेट चालविणारे मूळ सूत्रधार कोण आहेत, हे प्रथम शोधावे लागेल व त्याबाबतचे आदेश मी दिले आहेत आणि मला विश्वास आहे, ते नक्कीच सापडतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love